जाहिरात

Politics News: छगन भुजबळांनी धारण केलं मौनव्रत, फक्त ड्रायव्हरशीच बोलणार; असं काय घडलं?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे सध्या कमालीचे नाराज आहेत विशेष म्हणजे भाजपमध्ये देखील ते जातील अशा सध्या चर्चा रंगलेल्या आहेत.

Politics News: छगन भुजबळांनी धारण केलं मौनव्रत, फक्त ड्रायव्हरशीच बोलणार; असं काय घडलं?

प्रांजल कुलकर्णी, नाशिक: राजकीय नेत्यांच्या मिश्किल प्रतिक्रिया, कोपरखळ्या अन् आरोप- प्रत्यारोपांची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा होत असते. अनेकदा नेतेमंडळी अशी प्रतिक्रिया देतात की संपूर्ण राजकीय वर्तुळ ढवळून निघते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचीही सध्या राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत छगन भुजबळ?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे सध्या कमालीचे नाराज आहेत विशेष म्हणजे भाजपमध्ये देखील ते जातील अशा सध्या चर्चा रंगलेल्या आहेत. या नाराजीनंतर भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या तिन वेळा वेगवेगळ्या कारणास्तव  भेटी घेतल्या आहेत. यासोबतच मालेगावला अमित शाहांसोबत ते एका कार्यक्रमाला उपस्थित होते तर काल राष्ट्रीय सेवक संघाचे माजी सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांच्यासोबतही ते राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळ हे रामभक्त असल्याचं विधानही भैय्याजींनी केले होते. दरम्यान आज सकाळी छगन भुजबळ आपल्या भुजबळ फार्मवरून मुंबईकडे रवाना होत असताना पत्रकारांनी त्यांना गाठले. फडणवीसांचं छगन कमळ बघ हे वक्तव्य आणि इतर काही प्रश्न आहेत त्यावर तुमची प्रतिक्रिया हवी असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं

यावर छगन भुजबळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले. भुजबळांनी कॅमेरासमोर येत 'मी फक्त ड्रायव्हर सोबत बोलायचं असं ठरवलं आहे, टीव्हीशी बोलायचं नाही माझं मौनव्रत आहे मी कोणाशीही बोलणार नसल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे आता छगन भुजबळ यांचे हे मौनव्रत नेमकं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: