- नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे
- फडणवीस यांनी पीडितेच्या वडीलांसोबत फोनवरून संवाद साधून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा विश्वास दिला आहे
- आरोपीवर वेगाने चार्जशिट दाखल करून खटला फास्टट्रॅक कोर्टात मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत
नसरापूर इथं चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. पीडित चिमुकलीचे कुटुंबीय तर पूर्ण पणे खचून गेले आहेत. गावकऱ्यांच्या संतापाचा ही उद्रेक झालेला पाहायला मिळाला. असा स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित चिमुकलीच्या वडीलांसोबत फोनवरून संवाद साधला आहे. याची माहिती फडणवीस यांनीच दिली आहे. घटनेनंतर आपण पीडितेच्या वडीलांसोबत बोलल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय नराधमाला यमसदनी धाडू असं ही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पीडितेच्या वडीलांसोबत फोनवरून बोलल्याचं सांगितलं. त्यांना काही गोष्टी समजवून सांगितल्या. काही झालं तरी आरोपी नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देणारच असं ही ते म्हणाले. त्यासाठी वेळेवर चार्जशिट केले जाईल. खटला फास्टट्रॅक समोर नेला जाईल. त्यासाठी कोर्टाच्या आवश्यक त्या परवानग्या ही घेतल्या जातील. याबाबतचे आदेश दिले असल्याचं ही त्यांनी सांगितलं. रेकॉर्ड ब्रेक काळात ही केस मार्गी लावण्याचं आश्वासन ही दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी होत आहे. लोकांची कशी भावना आहे. ती भावना योग्य असल्याचं फडणवीस म्हणाले. लोकशाही मध्ये मात्र तसं करता येणार नाही. कायद्या नुसार या नराधमाला यमसदनी पाठवायचं आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार आहे. वेगात याची सुनावणी ही होईल. कसं लेखी पत्र ही पीडित मुलीच्या वडीलांना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यांनी आपला शब्द मानला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानल्याचं ही फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितलं.
या प्रकरणांनंतर नागरिकांमध्ये रोष आहे. तो सहाजीक आहे. मात्र काही जण वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही वडीलांना परिस्थिती समजून सांगितली आणि त्यांनी ती घेतली. मग आंदोलन मागे घेण्यात आले. आम्ही हा पीडित कुटुंबाच्या मागे ठाम पणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपी विरोधात काही जुने गुन्हे आहेत. ते ही शोधले जातील. तो आता कधी ही बाहेर येणार नाही असं फडणवीस यांनी ठाम पणे सांगितलं. दरम्यान कोणत्याही नेत्याने आपल्या घरी सांत्वनासाठी येवू नये असं पीडित मुलीच्या वडीलांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world