MSRTC NCMC Card: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी पारदर्शकता आणि डिजिटल प्रवासाला चालना देण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे एसटीच्या लालपरीमध्ये विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य!
एसटी प्रवासात सवलत मिळवण्यासाठी यापुढे एनसीएमसी (NCMC) म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक जे ७५ वर्षांवरील, महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेते या सर्वांना सवलतीसाठी हे कार्ड काढावे लागणार आहे, हे कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड असून ते प्री-पेड वॉलेट म्हणून काम करणार आहे.
Pune Traffic News: गुगल मॅप्सच्या मदतीने पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल
याचा वापर देशभरातील मेट्रो आणि बस प्रवासासाठीही करता येणार आहे. हे कार्ड नवीन काढण्यासाठी १९९ रुपये शुल्क असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास नवीन कार्ड १४९ रुपयांत मिळणार आहे. या कार्डमध्ये किमान १०० रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत देखील करता येणार आहे. हे कार्ड एसटी आगार, अधिकृत एजंट आणि नोंदणी मोहिमेद्वारे हे कार्ड घेता येणार आहे.
दरम्यान या करारासाठी पिंपरी चिंचवड आगारात सकाळी १० ते ६ या वेळेत नोंदणी सुरू करण्यात आली असून, कार्ड पोस्टाने घरी पाठवले जाणार आहे. हे कार्ड प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे, दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी पिंपरी चिंचवड च्या वल्लभनगर आगारात येऊन आपली नोंदणी करून घ्यावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा. असं आवाहन देखील पिंपरी चिंचवड च्या आगार प्रमुख पल्लवी पाटील यांनी केलं आहे.
Accident News: अंधारात अंदाज चुकल्याने कार थेट कालव्यात! पती- पत्नी बुडाले, तरुण मदतीला धावला अन्...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world