जाहिरात

Kajwa Festival : राज्यातील काजवा महोत्सवांवर निर्बंध; काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील काजवा महोत्सवाची संख्या वाढली आहे. भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर भागात मे, जून आणि जुलै या महिन्यात काजवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. मात्र या महोत्सवांमुळे काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात आल्याचं प्राणीप्रेमींकडून सांगितलं जात आहे.

Kajwa Festival : राज्यातील काजवा महोत्सवांवर निर्बंध; काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश

Kajwa Festival Restriction : गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील काजवा महोत्सवाची संख्या वाढली आहे. भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर भागात मे, जून आणि जुलै या महिन्यात काजवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. मात्र या महोत्सवांमुळे काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात आल्याचं प्राणीप्रेमींकडून सांगितलं जात आहे. या प्रकरणात राज्यातील काजवा महोत्सवांवर निर्बंध घालावेत असे राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या खंडपीठाकडून निर्देश देण्यात आले आहे. काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही यासाठी वनविभागाने खबरदारी घेण्याचे आदेशही खंडपीठाने यावेळी दिले आहेत. 

काजवा महोत्सवांवर निर्बंध घालावेत, असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही यासाठी वनविभागाने खबरदारी घ्यावी असं या निर्देशमध्ये म्हटलं आहे. पर्यावरणप्रेमीनी या काजवा महोत्सव विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतलेली. त्यानंतर आता न्यायाधिकरणाने हे निर्देश दिलेत. नियम आणि निर्बंधविषयी सूचना केल्या आहेत.

Pune Crime : पुण्यातील चोरांची चर्चा! महादेवाचा घेतला आशीर्वाद अन् दानपेटीतील पैसे केले लंपास

नक्की वाचा - Pune Crime : पुण्यातील चोरांची चर्चा! महादेवाचा घेतला आशीर्वाद अन् दानपेटीतील पैसे केले लंपास

राज्यात दाजीपूर -राधानगरी, महाबळेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, राजमाची, पुरुषवाडी, प्रभावळवाडी, भीमाशंकर, माळशेज घाट या अभयारण्यात मे महिन्याच्या शेवटी काजवा महोत्सव असतो. वनविभागात घुसखोरी करून महसूल मिळवण्यासाठी पर्यटन विभाग वनविभागासोबत हा महोत्सव आयोजित केला जातो. यासाठी अधिकृत स्वतंत्र नियमावली नाही. ती करावी आणि पर्यटकांवर कठोर निर्बंध घालावेत अशी मागणी पर्यावरणप्रेमीकडून होत होती. या महोत्सवाच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पर्यावरणप्रेमीनी धाव घेतली होती. त्यानंतर हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

काय आहेत नवे नियम?

  • रात्री 9 नंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश बंद
  • अभयारण्यात दर्शनी भागात प्रबोधनपर फलक लावणे
  • महोत्सव दरवर्षी न घेता एकवर्षाआड घ्यावेत
  • प्रत्येक पर्यटकाची नोंद करावी
  • तीन वर्षांसाठी निरीक्षक समिती नियुक्त करावी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com