राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबई (Navi Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) भविष्यात नवी मुंबईतील सध्याच्या ठिकाणाहून हलवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मुंबईसह उपनगरातील भाजीपाला, फळं, कांदे-बटाटे, धान्य यांचं वितरण नवी मुंबई एपीएमसीतून होते. त्यामुळे एपीएमसी हे राज्यभरातील शेती माल व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठीचं मोठं सेंटर आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने एपीएमसी मार्केटच्या जागेऐवजी विकास केंद्र (Growth Hub) उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्यासाठी सुमारे 100 एकर जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
नक्की वाचा - Panvel News: एक अधिकारी, एकाच ठिकाणी अनेक वर्ष कसा? मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार
नवी मुंबई महापालिकेने प्रस्तावित विकास केंद्रासाठी जमीन शोधण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवली असून, सिडकोच्या काही भूखंडांचीही पाहणी सुरू आहे. या विकास केंद्रामध्ये आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचा ठरवले आहे.
त्यामुळे सध्याच्या व्यापारी बाजारपेठेच्या जागेचा विकास हेतू बदलण्याचा विचार महापालिकेकडून केला जात आहे.
त्यामुळे एपीएमसी व्यवस्थापनाची चिंता वाढू लागली आहे. दरम्यान, या घडामोडींवर ‘मुंबई एपीएमसी'च्या व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बाजार समितीचे अनेक व्यापारी आणि पदाधिकारी यांनी स्पष्ट केलं की, जर एपीएमसीला दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलं. तर त्याचा फटका संपूर्ण पुरवठा साखळीला बसू शकतो.