Mumbai News: 'कितने आदमी थे? सरदार दो...', ठाकरे बंधुंच्या 'त्या' बॅनरची होतेय जोरदार चर्चा

Maharashtra Politics: मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रुपेश कदम यांनी केलेल्या बॅनरबाजीची चांगलीच चर्चा होत आहे. या बॅनरमध्ये शोले चित्रपटातील डायलॉग वापरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Melava: ठाकरे बंधुंचा एकत्रित मोर्चाचा इशारा, विरोधकांची आक्रमक भूमिका आणि मराठी शक्तीमुळे हिंदीसक्तीचा निर्णय राज्य सरकारला रद्द करावा लागला. या निर्णयानंतर राज्यभरात जल्लोष केला जात असून दोन्ही ठाकरेंचा विजयी मेळावाही निघणार आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या विजयी मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता नवी मुंबईत झळकलेल्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

Political news: उद्धव ठाकरें बरोबर आघाडी करायची की नाही?, दिल्लीतील बैठकीत काय झालं?

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसेकडून राज्यभरात जल्लोष केला जात आहे. मुंबईमधील मनसे पदाधिकाऱ्यांन ठिकठिकाणी बॅनरबाजी करत या निर्णयाचा विजयोत्सव साजरा केला आहे. अशातच मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रुपेश कदम यांनी केलेल्या बॅनरबाजीची चांगलीच चर्चा होत आहे. या बॅनरमध्ये शोले चित्रपटातील डायलॉग वापरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

Advertisement

कितने आदमी थे ? सरदार दो. और तुम तीन फिर भी वापस लौट आये, आ थू.. असा मजकूर या बॅनरवर लिहला आहे. हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द, मराठी एकजुटीचा विजय असो..असंही या बॅनरवर म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठीच्या विजयाचे स्वागत करण्यासाठी हिंदीमधूनच डायलॉग लिहल्याने या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे.  दुसरीकडे, 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांचा एकत्रित विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक आणि शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांचे ट्विटही चांगलेच व्हायरल होत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Assembly News: 'अधिकाऱ्यांना बांधून आणा', मुनगंटीवार भडकले, खोतकर मदतीला धावले, विधानसभेत काय घडलं?

"ही दोन लढवय्या भावांची गोष्ट. काही रान कुत्र्यांनी जंगलात उच्छाद घातला होता, एकदा सिंहाला एकटा पाहून रान कुत्र्यांनी डाव साधायचं ठरवले.  मग रान कुत्र्यांनी झुंडीने त्या सिंहावर हल्ला चढवला  तो सिंह निकराने जिद्दीने त्या रान कुत्र्यांशी झुंजत होता,  हे सर्व त्या सिंहाच्या भावाने पाहिले आणि तोही लढाईत उतरला,  त्या दोन भावांनी हिंस्र झुंडीला पळवून लावलं. आणि दोन लढवय्या भावांच्या शक्तीने, जंगल रान कुत्र्यांच्या झुंडी पासून मुक्त झालं  ह्या गोष्टीचा अर्थ महाराष्ट्राला समजलाच असेल. महाराष्ट्र द्रोही यांना धडकी  धडकी भरवणारा मेळावा. मराठीची एकजूट महाराष्ट्राची वज्रमुठ, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.