जाहिरात

Jalgaon News: रोहिणी खडसेंवर माजी पीएच्या पत्नीचे गंभीर आरोप; प्रकरण महिला आयोगात पोहोचलं

रोहिणी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पांडुरंग नाफडे याच्या पत्नीने केला आहे.

Jalgaon News: रोहिणी खडसेंवर माजी पीएच्या पत्नीचे गंभीर आरोप; प्रकरण महिला आयोगात पोहोचलं

मंगेश जोशी, जळगाव

Jallgaon News : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या माजी पीएच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे याच्याकडून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकरणात रोहिणी खडसे यांचं देखील नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

(नक्की वाचा-  Nashik Politics: तीन दिवसांपूर्वी दरोडाप्रकरणी गुन्हा; फरार आरोपी आज भाजपमध्ये प्रवेश करणार)

रोहिणी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पांडुरंग नाफडे याच्या पत्नीने केला आहे.  राजकीय दबावामुळे पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप देखील नाफडे यांच्या पत्नीने केला आहे. 

पांडुरंग नाफडे यांची पत्नी सीमा नाफाडे यांनी अखेर याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे सीमा नाफाडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.  

(नक्की वाचा-  Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)

रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सीमा नाफडे यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. रोहिणी खडसे यांच्यावरील धमकीच्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com