शुभम बायस्कर, अमरावती:
Amravati News: राज्यात सुरु असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत आहे. ज्याचा थेट फटका भाजपला बसत आहे. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर आता भारतीय जनता पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच अमरावतीत पक्ष विरोधी काम करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अमरावतीत 15 भाजप पदाधिकाऱ्यांचे निलंबन
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अमरावती शहर भाजप शाखेने पक्षाविरोधी भूमिका घेतलेल्या या १५ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यावर निलंबनाची ही कारवाई पक्षातील गटबाजीवर लगाम घालण्यासाठी असल्याचे पक्षाकडून सांगितले जाते.
NDTV BMC Power Play: 'मुंबईत आहोत की कराची पाकिस्तानमध्ये अशी स्थिती' नितेश राणे असं का म्हणाले?
या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केल्याचा आणि विरोधकांना बळ देण्याचा आरोप आहे, भाजपची उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी आणि युवा संविधान पक्षाची उमेदवारी घेतली होती, त्यांनी पक्षाचा आदेश व शिस्त पाळली नाही असा त्यांच्यावर आरोप आहे.
पक्षविरोधी काम केल्याचा ठपका
या संदर्भात माहिती देताना डॉ.नितीन धांडे यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टीच्या संविधानातील पक्षशिस्त निष्ठा व संघटनात्मक मूल्यांचा अपमान करणारी ही कृती असल्यामुळे अशा पक्षा विरोधी वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. यामुळे संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विवेक चुटके, ज्योती वैद्य गौरी मेघवानी, किशोर जाधव, अनिषा मनीष चौबे, सचिन पाटील, संजय वानरे, सतीश करेसिया, शिल्पा पाचघरे, दीपक गिरोळकर, योगेश वानखडे, मेघा हिंगासपुरे, संजय कटारिया, रश्मी नावंदर, धनराज चक्रे या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून निलंबित करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world