Sunetra Pawar: दादांप्रमाणे वहिनींचा रुद्रावतार, NCP बैठकीत 'त्या' आमदाराला झाप झापलं

राष्ट्रवादीच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी आता समोर आली असून विलिनीकरणाच्या चर्चांवरुन आमदार हिरामण खोसकर यांना चांगलंच झापल्याचे सांगण्यात येत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Sunetra Pawar NCP MLA Meeting Inside Story: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे दुःख सावरुन सुनेत्रा पवार या कामाला लागल्या आहेत. सोमवारी सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच पक्षातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीतील इनसाईड स्टोरी आता समोर आली असून विलिनीकरणाच्या चर्चांवरुन आमदार हिरामण खोसकर यांना चांगलंच झापल्याचे सांगण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

उपमुख्यमंत्रीपद तसेच राष्ट्रवादीची सुत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी आमदारांसोबत चर्चा केली तसेच काही महत्त्वाच्या विषयांवरुन थेट खरडपट्टी केल्याचे समोर आले आहे. यावेळी सर्वांनी विनंती केली म्हणून मी पदाचा स्विकार करते. पक्षासमोर मोठी आव्हानं आहेत. सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साद सुनेत्रा पवारांनी घातली. 

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष शिगेला! शिवसेनेकडून मोठी घोषणा, थेट अभियान सुरु...

आमदाराला झापलं

त्याचबरोबर विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन या बैठकीत वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. विलिनीकरणावर सार्वजनिक मत मांडू नका, वैयक्तिक मत सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरेंकडे मांडा अशा सूचना पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या. आमदार हिरामण खोसकर यांनी विलिनीकरणावर सार्वजनिक विधान केले होते. त्यांना या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार तसेच सुनील तटकरेंनी चांगलेच झापल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी आग्रही भूमिका मांडली होती. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण शंभर टक्के झालं पाहिजे. नेत्याला खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर दोन तीन महिन्यांपासून सुरु असलेली विलिनीकरणाची चर्चा पूर्ण व्हावी, तसं झाले तर आम्हाला आनंद होईल, असं स्पष्ट मत खोसकर यांनी मांडले होते. 

Advertisement

Narhari Zirwal News: 'पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या', लाच प्रकरणी सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांकडे नाराजी