जाहिरात
This Article is From Dec 07, 2024

EVM विरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, अभिषेक मनु सिंघवींची वेळ घेणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करीत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे.

EVM विरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, अभिषेक मनु सिंघवींची वेळ घेणार
मुंबई:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करीत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी शरद पवार गटाकडून प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेणार असल्याची माहिती आहे. सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती आहे. ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढाई देण्याची तयारी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 

शपथविधीच्या दुसऱ्याचा दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा; आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांची मालमत्ता मुक्त

नक्की वाचा - शपथविधीच्या दुसऱ्याचा दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा; आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांची मालमत्ता मुक्त

यापूर्वी महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे यंदा महाविकास आघाडी कायदेशीर अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. यासाठी ते प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेणार आहेत. त्यांचा कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मविआ पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. 

अजित पवारांचे उमेदवार पराभूत कसे झाले? देवगिरीवर त्यांनी पाढाच वाचला

नक्की वाचा - ​​​​​​​अजित पवारांचे उमेदवार पराभूत कसे झाले? देवगिरीवर त्यांनी पाढाच वाचला

सत्ताधाऱ्यांकडून टीका..
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आलं होतं. त्यावेळी ईव्हीएमचा घोळ नव्हता का? असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आता विधानसभा निवडणुकीत मविआला पराभवाचा सामना करावा लागल्याने ईव्हीएमचा घोटाळा झाला का, असा प्रश्न केला जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com