जाहिरात

PM Modi : 'चॅलेंज एक्सेप्टेड'! PM मोदींचं लक्ष्य बंगाल; तृणमूलच्या 'वाघीण' शी थेट सामना, कोण जिंकणार?

PM Narendra Modi vs Mamata Banerjee : बिहार विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बंगाल हे पुढील लक्ष्य असल्याचं जाहीर केलं आहे.

PM Modi : 'चॅलेंज एक्सेप्टेड'! PM मोदींचं लक्ष्य बंगाल; तृणमूलच्या 'वाघीण' शी थेट सामना, कोण जिंकणार?
PM Narendra Modi vs Mamata Banerjee : बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी कामाला लागले आहेत.
मुंबई:

PM Narendra Modi vs Mamata Banerjee : बिहार विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बंगाल हे पुढील लक्ष्य असल्याचं जाहीर केलं आहे. बंगालमध्ये भाजपाला आजवर कधीही सत्ता मिळालेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत बंगाल जिंकण्याचं ध्येय त्यांनी नवी दिल्लीत झालेल्या विजय सभेत जाहीर केलं आहे. 

बंगाली अस्मितेचा मुद्दा आणि तृणमूलचं चॅलेंज

पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर तृणमूल काँग्रेस (TMC) कडून तातडीने प्रतिक्रिया उमटल्या. पश्चिम बंगालच्या मंत्री शशि पांजा यांनी पंतप्रधानांना 'भ्रमात' न राहण्याचा सल्ला देत, बंगालमध्ये भाजपचा विजय 'असंभव' असल्याचे म्हटले आहे.

राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी मोदींवर टीका करताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल जिंकण्याची, बंगालवर कब्जा करण्याची भाषा करत आहेत, जणू बंगाल त्यांच्या बायोडाटामध्ये जोडण्यासाठी आणखी एक जमीनीचा तुकडा आहे." तर पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी तर, "बंगालची वाघीण त्यांची वाट पाहत आहे." या शब्दात पंतप्रधान मोदींना आव्हान दिलंय. 

( नक्की वाचा : Rohini Acharya: लालूंना किडनी देणाऱ्या रोहिणी आचार्यांवर तेजस्वींनी चप्पल का फेकली? 'यादवी' ची Inside Story )
 

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहिला तर, त्यांना अशा आव्हानांची सवय आहे, इतकेच नव्हे तर त्यांनी प्रत्येक आव्हान अतिशय यशस्वीपणे पेलले आहे. आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

आव्हाने स्वीकारणे ही मोदींची खासियत

बंगालच्या आव्हानाकडे पाहण्याआधी, पंतप्रधान मोदींनी मागील काही वर्षांत यशस्वीरीत्या पेललेली काही मोठी आव्हाने लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, ज्यात विरोधकांनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत आव्हान दिलं होतं.

बिहारमध्ये मोठं यश

बिहार निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांनी "बिहारला बाहेरील शक्ती नियंत्रित करू देणार नाहीत, बिहार बिहारीच चालवेल," असे आव्हान दिले होते. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान मोदींना 'घाबरट' असे संबोधून टीका केली होती. परंतु, पंतप्रधान मोदींनी हे आव्हान स्वीकारले आणि प्रचारात "नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए बिहारमधील सर्व जुने विक्रम तोडण्यासाठी तयार आहे" असा विश्वास व्यक्त केला.

झालेही तसेच; एनडीएने या विधानसभा निवडणुकीत इतिहास रचला. "बिहारला कट्टाराजपासून मुक्ती देऊ" हा शब्द पंतप्रधान मोदी यांनी खरा करून दाखवला आणि त्यांनी जाहीर केलेले लक्ष्य साधले.

( नक्की वाचा : Bihar Election Results 2025: काँग्रेसमध्ये मोठी फुट अटळ! बिहारच्या निकालानंतर PM मोदींची धक्कादायक भविष्यवाणी )
 

'या जन्मात दिल्ली जिंकू शकत नाहीत'चे आव्हान

दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांनी 2023 साली विधानसभेत म्हंटलं होतं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी या जन्मात दिल्ली जिंकू शकत नाहीत." निवडणूक प्रचारातही त्यांनी "आम्हाला हरवण्यासाठी तुम्हाला आणखी एक जन्म घ्यावा लागेल," असे आव्हान दिले होते.

यावर पंतप्रधानांनी, "दिल्लीमध्ये पुढचे सरकार भाजपाचे बनेल" असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांचे हे आव्हान स्वीकारून 'आप'ला दिल्लीमधून उखडून फेकले आणि मोदींच्या नेतृत्वावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय स्तरावर पेललेली ऐतिहासिक आव्हाने

राजकीय आव्हानांव्यतिरिक्त, देशातील दीर्घकाळ प्रलंबित आणि वादग्रस्त ठरलेल्या मुद्द्यांवरही मोदी सरकारने ठाम भूमिका घेतली आणि विरोधकांची तीव्र टीका व आव्हाने भेदून ते निर्णय मार्गी लावले. यामध्ये  जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवणे, मुस्लीम महिलांना ट्रिपल तलाकाच्या अत्याचारातून मुक्त करणारा कायदा, वक्फ सुधारणा विधेयक 2025 याचा समावेश आहे.तसंच विरोधकांची टीका, टोमणे आणि आव्हानांचा  सामना करत मोदी सरकारच्या काळातच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती झाली आहे.

आता बंगालची पाळी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा देशासमोर अनेक आव्हाने होती. अनेक 'अशक्य' मानले गेलेले मुद्दे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. विरोधी पक्ष आणि नेत्यांनी आव्हान देऊनही, मोदी सरकारने केवळ ते आव्हान पूर्ण केले नाही, तर 'अशक्य ते शक्य' करून दाखवले आहे.

या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या 'जंगलराज'ला उखडून फेकून बंगालला भगवाधारी बनवण्याचे जे आव्हान पंतप्रधान मोदींनी स्वीकारले आहे, ते पूर्ण करण्याची त्यांची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती देशाने अनेकदा पाहिली आहे. त्यामुळे, तृणमूल काँग्रेसची दर्पोक्ती टिकणार की बिहारप्रमाणेच बंगालमध्येही भाजप ऐतिहासिक विजय मिळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com