राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचं अपघाती निधन; काही दिवसांपूर्वीच केला होता पक्षप्रवेश

Gadchiroli News: ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनीष रक्षमवार, गडचिरोली

गडचिरोली राजकीय क्षेत्रातील एक सक्रिय आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे अपघाती निधन झाले आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे येत असताना त्यांचा अपघात झाला.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश

गीताताई हिंगे यांनी गडचिरोलीच्या राजकारणात मोठे योगदान दिले होते. त्यांनी यापूर्वी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा महामंत्री यांसारख्या महत्त्वाच्या पदांची धुरा सांभाळली होती. गीताताई यांनी काही दिवसांपूर्वीच, म्हणजे 26 नोव्हेंबर 2025 रोजी, भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला होता.

(नक्की वाचा- Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात)

ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राजकीय कामांसोबतच गीताताई हिंगे या सामाजिक क्षेत्रात सुद्धा नेहमीच अग्रेसर होत्या.

आधार विश्व फाउंडेशन

त्यांनी आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली होती. या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदत केली होती. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती.

Advertisement

(नक्की वाचा : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?)

गाताताई हिंगे निधनामुळे, गडचिरोली शहराने एक अत्यंत उत्साही आणि समाजकार्याची तळमळ असलेले नेतृत्व गमावले आहे. त्यांचे अपघाती निधन हे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळासाठी एक मोठा धक्का आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Topics mentioned in this article