जाहिरात

NDTV BMC Power Play: एकनाथ शिंदे, भाजपसोबत पुन्हा युती करणार का? संजय राऊतांच्या उत्तराने लक्ष वेधलं

NDTV BMC Power Play 2026: शरद पवार असताना त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला. अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांच अस्तित्व राहिलं. त्यानंतर लोक त्यांना लाथा मारतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

NDTV BMC Power Play: एकनाथ शिंदे, भाजपसोबत पुन्हा युती करणार का? संजय राऊतांच्या उत्तराने लक्ष वेधलं

NDTV BMC Power Play Sanjay Raut:  शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. विशेषतः ठाकरे कुटुंबातील ऐक्य, भाजपसोबतचे संबंध आणि मुंबईच्या अस्मितेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. "राज आणि उद्धव यांच्यात वैयक्तिक भांडण कधीच नव्हतं. त्यांच्या विचारधारा वेगळ्या असू शकतात, पण ते शेवटी भाऊ आहेत," असे म्हणत राऊत यांनी ठाकरे कुटुंबातील ऐक्याचे समर्थन केले. मुंबई महापालिका विशेष 'NDTV पॉवर प्ले' या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

"ठाकरे कुटुंबाला एकत्र पाहणे माझे भाग्य"

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो. " राज आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही मित्र आहे. जर मी या दोन भावांना एकत्र आणण्यासाठी काही मदत करू शकलो, तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. मी आज जे काही आहे, ते ठाकरे कुटुंबामुळेच आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. "राज ठाकरेंना काही गोष्टी सोडाव्या लागतील. तिरस्काराचे राजकारण देशाला परवडणारे नाही, अन्यथा देश पुन्हा फुटेल," असं महत्त्वाचं विधान देखील संजय राऊत यांनी केलं. 

NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला

भाजपसोबतच्या जुन्या संबंधांवर बोलताना राऊत म्हणाले की, आमचा आणि भाजपचा डीएनए एकच (हिंदुत्व) आहे. मात्र, 2019 मध्ये भाजपने सत्तेसाठी आमच्याशी बोलणीच केली नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, पण 2019 साली आम्हाला उपमुख्यमंत्री पद द्यायलाही ते तयार नव्हते," अशी आठवण त्यांनी करून दिली.

अमित ठाकरेंच्या 'ट्रेन रोखू' वक्तव्यावर उत्तर

"मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उत्तर भारतातून येणाऱ्या ट्रेन रोखू या वक्तव्यावर राऊत म्हणाले की, "राजकारणात येणारी नवीन मुलं एक वारसा घेऊन येतात. त्यांना प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. कुणीही कुणाची ट्रेन रोखू शकत नाही. देशात प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, मात्र जिथे जाल तिथे स्थानिक लोकांचा हक्क हिसकावू नका."

भाजप नेते अण्णामलाई यांच्या विधानावर टीका करताना राऊत म्हणाले, "मुंबई महाराष्ट्राची नाही, हे म्हणणे अत्यंत संवेदनशील आणि चुकीचे आहे. मुंबईवर भाजपचा राग आहे. गेल्या 10  वर्षांत तुम्ही मुंबईला कमकुवत करून सर्व काही गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे, हे विसरू नका."

भाजप- एकनाथ शिंदेंसोबत जाणार का? 

"भाजपच्या उघड्या दरवाजातून जे गुंड भ्रष्टाचारी आत गेलेत त्यांन दूर करावं लागेल. आत जी शाळा सुरु ये ती बंद करावी लागेल. भाजपने नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत दर्शन घडवावं. पक्ष फोडण्याविषयी आमचं काही नाही. सत्तेचा वापर करून त्यांना यंत्रणेंचा वापर करून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फक्ष आगा पिछा नसलेल्या माणसाच्या हाती दिला. शरद पवार असताना त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला. अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांच अस्तित्व राहिलं. त्यानंतर लोक त्यांना लाथा मारतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

NDTV BMC Power Play LIVE : "मुंबईचा महापौर शिंदेंचा की भाजपचा हे आधी ठरवा", सुषमा अंधारे

तसेच "एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र काम केलं आहे. आमचे ते जुने सहकारी आहेत. आम्ही एकत्र असताना आमचे मित्र होते. समोर आले की नमस्कार करणे शिष्टाचार आहे. त्यांनी आमच्या तब्येतीच विचारपूस केली.मात्र पुढे कधीही एकत्र  येणार नाही, एकनाथ शिंदेंसोबत कधीही युती होऊ शकत नाही. त्यांनी ज्याप्रकारे पाठीत खंचिर खुपसला त्यांना सोबत घेणे म्हणजे शिवसेनेचं अधपतन करण्यासारखं आहे.." असंही ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com