NDTV मराठी पहिल्या वर्धापनदिनाच्या औचित्याने महाराष्ट्राच्या प्रगतीचा लेखाजोखा आणि भविष्यातील विकासाचा आराखडा राज्यासमोर मांडणारे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे याउद्देशानं तयार झालेल्या 'NDTV मराठी मंच'चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या वहिल्या 'NDTV मराठी मंच'वर राज्यातल्या सर्वात ताकदवान आवाजांचा समावेश असेल. यानिमित्ताने राजकीय नेते विविध विषयांवर आपली भूमिका मांडतील. मंच या कार्यक्रमात विविध विषयांचा ऊहापोह केला जाणार आहे. अगदी उद्योग क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंतचे विविध पैले मंचवर मांडले जाणार आहेत.
यावेळी विविध क्षेत्रातील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नव्याने मंत्रिपद मिळालेले राजकीय नेते नवा गडी, नवं राज्य या विषयाअंतर्गत आपले विचार मांडलीत. यातील सहभागी वक्ते त्यांच्या खात्याची माहिती देतील. यामध्ये शिवेंद्रराजे भोसले, प्रकाशराव अबिटकर, मेघना बोर्डिकर सहभागी होती. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील उद्योगाची स्थिती आणि आव्हाने या विषयाअंतर्गत महाराष्ट्रातील उद्योगांचा आढावा घेतला जाईल. यामध्ये चितळे बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे, एमएससी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे चेअरमन विद्याधर अनास्कर, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे आपली भूमिका मांडतील.