"आमचं सरकार आल्याने अडीच वर्षांची नकारात्मकता गेली"; 'NDTV मराठी'वर CM एकनाथ शिंदेंची खास मुलाखत

NDTV मराठी या वृत्तवाहिनीचं लोकार्पण आज महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

NDTV मराठी या वृत्तवाहिनीचं लोकार्पण आज महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झालं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बिझी शेड्युलमधून वेळ काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीटीव्हीच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्ही मराठीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास मुलाखत एनडीटीव्ही मराठीला दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे सरकारवही टीका केली. महाराष्ट्रात दोन वर्षात मागे वळून पाहिलं तर अटल सेतू प्रकल्प, मुंबईचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा, समृ्द्धी महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकमुळे अशी विकास कामे वेगाने झाली आहेत.  

महाराष्ट्रात जी नकारात्मकता होती ती निघून गेली

मुंबईत मेट्रोची कामं वेगाने सुरु आहे. मधल्या काळात हे काम थांबलं होतं. कुणामुळे या कामात अडथळा आला, यावर मी फार बोलणार नाही. राज्यकर्त्यांनी कामे करताना इगो मधे आणू नये. त्यामुळे मधल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात जी नकारात्मकता होती ती निघून गेली आहे. लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे, असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

Advertisement

(नक्की वाचा- पालघरची जागा भाजपा लढवणार, 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा)

मी घरी बसून फेसबुक लाईव्ह करत नाही

राज्यात आमचं सरकार आलं त्यावेळी आम्ही आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य दिलं. महात्मा फुले आरोग्य योजनेचं अर्थसहाय्य पाच लाख रुपयांवर  नेलं आहे. नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. 12.5 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होणार आहे. मुंबईत कॅशलेस सेवा दिली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन केला. मी घरी बसून फेसबुक लाईव्ह करत नाही, कामे करतो, अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली. 

महायुतीत नाराजीच्या अफवा

महायुतीमध्ये कुठलीही नाराजी नाही. महायुतीच्या जागा जास्त आल्या पाहिजेत हे उद्दिष्ट आमचं आहे. समीकरणं बदलत असतात, उमेदवार बदलला म्हणजे तो उमेदवार चांगला नाही असं होत नाही. आम्ही एकमेकांना विचारूनच काम करतो. त्यामुळे नाराजीचा विषय नाही. या सर्व अफवा आहेत. 

Advertisement