NDTV मराठीचा 1 लाखांचा टप्पा पार; देवेंद्र फडणवीसांसह मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

NDTV मराठीने मोठी कामगिरी फत्ते करीत युट्यूब (NDTV Marathi YouTube Channel) चॅनलवरील एक लाखांचा टप्पा पार केला आहे. अत्यंत कमी कालावधीत एक लाख सबस्क्रायबर्स मिळवणं अवघड बाब होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

NDTV मराठीने मोठी कामगिरी फत्ते करीत युट्यूब (NDTV Marathi YouTube Channel) चॅनलवरील एक लाखांचा टप्पा पार केला आहे. अत्यंत कमी कालावधीत एक लाख सबस्क्रायबर्स मिळवणं अवघड बाब होती. मात्र प्रेक्षकांचं प्रेम, टीमची चिकाटी, सचोटी अन् संयम राखल्यामुळे हे यश मिळू शकलं. सहा महिन्यांपूर्वी रुजवलेलं रोपटं आता वटवृक्ष होऊ पाहत आहे. 

मनोरंजनपर आशयापेक्षा लोकांसाठी उपयुक्त ठरेल असा माहितीपर आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणं याकडे टीमचा कल राहिला आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत युट्यूब चॅनलवर नवनवे उपक्रम राबवण्यात आले.

यामध्ये NDTV मराठीचे (NDTV Marathi) प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांचा 'जातिवंत महाराष्ट्र'सारखं सदर सुरू आहे. या व्हिडिओ मालिकेत  महाराष्ट्रातील विविध जातींचा अभ्यास करण्यात आला आहे. महाराष्ट्रात किती जाती आहेत? त्यांची लोकसंख्या किती? जातींचा निवडणुकांवर होणारा परिणाम, कोणत्या समाजाची निवडणुकीत निर्णायक भूमिका ठरू शकते, कोणत्या भागात कोणत्या समाजाचं प्राबल्य? याची माहिती मिळते. 
 

सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं तापलं आहे. त्यासाठी नवी व्हिडिओ मालिका सुरू करण्यात आली आहे. 'ताई माई अक्का' या नव्या व्हिडिओ मालिकांच्या माध्यमातून राज्यातील  सध्याच्या राजकीय वातावरणाविषयीची महिलांची मतं जाणून घेतली जात आहे.

Advertisement

याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'दोन मुद्दे' ही देखील सध्याच्या बातमीबद्दल वेगवेगळे पैलू सांगणारे सदर. BMC आयुक्त भूषण गगराणी यांनी NDTV मराठीच्या यशासाठी खास शुभेच्छा दिल्या.

याबरोबरच NDTV मराठीच्या डिजिटलचे प्रमुख श्रीरंग खरे यांच्या 'खरे सांगेन' या व्हिडिओ मालिकेतून बातमीमागील खरी बातमी शोधण्याचा आणि काही मिनिटात बातमीचे वेगवेगळे तर काही वेळा दुर्लक्षित पण महत्त्वाचे पैलू धुंडाळले जातात. अर्थकारण सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी 'मनी टाईम' सुरू करण्यात आलं आहे. 

Advertisement

वेगवेगळ्या धाटणीचा आणि प्रयोगशील आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी NDTV मराठी कायम प्रयत्नशील आहे. युट्यूबवर एक लाखांचा टप्पा पार केल्यानंतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाबासकीची थाप दिली. त्याशिवाय चित्रपटक्षेत्रातील मान्यवरांनाही  NDTV मराठीला शुभेच्छा दिल्या. सर्व सबस्क्रायबर्सचे आणि मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.