Water Crisis : पाणी प्रश्न पेटला! सोलापूर आणि फलटण आमने-सामने, शहाजी बापूंनी दिला गंभीर इशारा

Neera Deodhar Dam : सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस-सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पाण्याचा संघर्ष तीव्र झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच राज्यात अनेक ठिकाणी पाणी प्रश्न तीव्र होतोय. त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस-सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पाण्याचा संघर्ष तीव्र झाला आहे. नीरा देवधर धरणाचे 1 टीएमसी पाणी हे सांगोला , माळशिरस आणि पंढरपूरच्या दुष्काळी गावांना मिळावे. यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मात्र या निर्णयाला फलटणच्या संजीवराजे निंबाळकर यांनी विरोध केला आहे. याच संजीवराजे निंबाळकर यांचा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी निषेध करत आपण सांगोळ्याला पाणी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे स्पष्ट केले आहे. शिवाय खासदार धैर्यशील मोहिते पाटील पाण्याबाबत कुठली भूमिका घेणार असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे फलटण शेजारील मान खटावचे आमदार आहेत. तर फलटणचे रणजीतसिंह निंबाळकर हे माढा लोकसभेचे माजी खासदार आहेत. या दोघांनी सांगोला आणि माळशिरसला पाणी मिळावे यासाठी मोठे प्रयत्न केले. परिणामी रामराजे आणि संजीवराजे निंबाळकर विरुद्ध रणजीतसिंह निंबाळकर व जयकुमार गोरे अशा फलटणच्या दोन गटातील राजकारणाची किनार सांगोला आणि माळशिरसच्या पाण्यावर येऊन ठेपली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  Sangram Thopate : पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप! काँग्रेसचा बडा नेता हाती घेणार भाजपाचं कमळ? )

नीरा देवधरचे पाणी माळशिरसला मिळावे. 'टेल टू हेड' नियमानुसार शेवटचा टप्पा असणाऱ्या सांगोला आणि माळशिरसला पाणी मिळावे यासाठी सांगोला आणि माळशिरस मधील जनता गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. हे पाणी त्यांना मिळत असताना आता फलटणकरांच्या विरोधाची धार तीव्र झालीय.   

फलटणचे रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर या विषयावर मैदानात उतरले आहेत. फलटणचे वाढीव पाणी सांगोला आणि माळशिरसला देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.  त्यावर माळशिरसमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी संजीवराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन केले.
 

Advertisement
Topics mentioned in this article