
Indian Railways 20 % off Offer : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवी ऑफर सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांचे काही पैसे वाचणार आहेत. प्रायोगित तत्वावर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. (Indian Railway New Offer)
काय आहे ऑफर?
भारतीय रेल्वेकडून एक्स्प्रेस गाड्यांच्या बुकिंगवर ही सवलत दिली आहे. इच्छित स्थळावर जातानाचे तिकीट आणि परतीचं तिकीट अशी दोन्ही तिकिटं एकत्र बुक केल्यास प्रवाशांना 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होणार आहे. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास, जर तुम्ही मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई अशा दोन्ही ट्रेनचं तिकीट एकाच वेळी बुक केलं, तर तुम्हाला 20% सूट मिळेल.
नक्की वाचा - लाडके भाऊ 7 तास रेल्वे स्थानकावर; रक्षाबंधनासाठी सोडणारी विशेष ट्रेन लेट
तुम्ही एखादा दौरा आधीच प्लान केला असेल तर या सवलतीचा फायदा घेता येऊ शकेलं. परतीचं तिकीटही आधीच बुक केलं असेल तर प्रवाशांना 100 रुपयांमागे 20 रुपये असे तुमच्या तिकिटाची रक्कम जितकी असेल त्यावर 20 टक्के सूट मिळू शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world