Shirdi News : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार (30 मार्च) पासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झालं. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचं साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2018 साली कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती ती आता पूर्ण झाली आहे. तर नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभ मेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार असल्याच सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. इंडिगो कंपनीच 60 प्रवाशांना घेवून पहिल विमान शिर्डी विमानतळावर उतरले. यावेळी साईभक्तांमध्ये उत्साह बघायला मिळाला. ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प, साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले.
नक्की वाचा - Shirdi Saibaba : साईबाबांच्या मूळ पादुकांचा वाद उच्च न्यायालयात, भारतभ्रमण दौऱ्याला का होतोय विरोध?
साधारण एक वर्षांपूर्वी 8 एप्रिल 2024 रोजी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची यशस्वी चाचणी पार पडली. त्यानंतर भाविकांची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण कंपनीने नाईट लँडिग सुविधा सुरु केली आहे.