Nitesh Rane Speech On Nashik Kumbh Mela 2026: नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातील एका लॉन्सवर 'हिंदूंचा रुपया हिंदूंनाच' या हिंदू लघु व्यावसायिकांच्या यादीचे प्रकाशन झाले. सकल हिंदू समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी इथं सर्वधर्म समभाव भाईचारा चालणार नाही, हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या, असं आवाहन केले.
काय म्हणाले नितेश राणे?
"हिंदूंकडून हिंदूंनी खरेदी करावी या संकल्पनेवर हा कार्यक्रम आयोजित केला. ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन. मी खारघरच्या कार्यक्रमात अशी भूमिका मांडली होती. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकाने होती. मध्येच माझा कार्यक्रम होता. हिंदूंनी हिंदूंकडून घ्यावे म्हटलो. मीडियाच्या बंधूंनी मला झोडझोड झोडले. मला त्याचे काहीही तेव्हा वाटलं आजही काही वाटलं नाही. मी हिंदूचे नाहीतर मग पाकिस्तानबद्दल बोलायचं का? ९० टक्के लोकं इथं राहतात, हे हिंदूच राष्ट्र आहे, इथं सर्वधर्म समभाव भाईचारा चालणार नाही," असं मंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.
"हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या. कुंभ मेळ्याच्या बाबत तेव्हाही भूमिका स्पष्ट केली आहे. कुंभमेळ्यात हिंदूंची दुकाने लावावी, हिरवा साप वळवळता कामा नये, आता त्यांचा रमजान सुरू आहे. असे पदार्थ ठेवतात त्याकडे बघू वाटत नाही, रमजान काळात एका हिंदूंचे दुकान लागत नाही. हिंदूंचे पदार्थ ते विकत नाहीत,असा एकही माणूस तिथं भेटणार नाही. कुंभ मेळ्यात एक पण जिहादी आला नाही पाहिजे, त्याची हिम्मत नाही झाली पाहिजे," असा इशाराही नितेश राणेंनी यावेळी दिला.
'कुंभमेळ्यात मुस्लीम स्टॉल उखडून टाका'
तसेच "नाशिक मनपात फक्त जय श्रीराम असणार आय लव्ह मोहम्मद चालणार आहे. आमच्या हिंदुकडे वाकड्या नजरेने पाहिले तर आम्ही विनंती करणारे नाही, कुंभमेळ्यात लक्ष ठेवा, स्टॉल लावायला आला तर उखडून टाका. आम्ही मंत्रालयात बसलो आहे, धर्मातर बाबत पुढील आठवड्यात कायदा पास होईल. लव्ह जिहाद विरोधात सर्वात कडक कायदा आपल्या राज्यात असेल, कुठलाही जिहादी आपल्या हिंदू बघिणीकडे बघणार नाही. माझ्याकडे मत्स्य व बंदर खाते आहे, एकही अब्दुल तलावाच्या बाजूला ठेवणार नाही, आपण चायनीज माल नाही, प्युअर आहे, बिर्याणी खाईल तर हिंदूंकडून खाईल," असंही विधान नितेश राणेंनी केले.
VIDEO: कुत्र्यासारखा भुंकतोय, चालतोय... तरुणाची झालीय 'अशी' भयावह अवस्था; व्हिडिओ पाहून हादरुन जाल