Nitesh Rane on Burqa : महाराष्ट्र राज्य बोर्डाची बारावीची (HSC) परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तर दहावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात या परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षांना आता एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी आता परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. त्याचवेळी मत्स्यपालन आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणेंनी लिहिलं पत्र
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच बुराखा घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश नको, अशी मागणी करणारं पत्र राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांना लिहलं आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
राणे यांनी या पत्रात म्हंटलं आहे की, ' इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांचं संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरता शासनस्तरावरुन वेळोवेळी सूचना दिल्या जातात.
( नक्की वाचा : 'सैफ अली खानवरील हल्ला संशयास्पद', नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य! )
जर, एखादा परीक्षार्थी बुरखा घालून प्रवेश केंद्रावर आला तर कुणी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करत आहे की नाही, हे तपासणे शक्य नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसंच कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अनेक विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान सहन करावं लागेल.
या विषयावर तातडीनं कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना योग ते आदेश द्यावेत, अशी मागणी राणे यांनी या पत्रात केली आहे.