गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटावर पुन्हा निशाणा साधला आहे. सत्तेत आल्यानंतर सुडबुद्धीचं उघड राजकारण करण्यास नितेश राणे यांनी सुरुवा केली आहे. ठाकरे गटाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे यांनी म्हटलं की, "नवीन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे. ठाकरे गटाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत हे कुणीही विसरू नये. तुमची सत्ता आलेली आहे. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संधीचं सोनं करा", असं आवाहन राणेंनी कार्यकर्त्यांना केलं.
(नक्की वाचा- Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा)
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला. सगळी कामं नाकारली, निधी दिला नाही. महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याच काम केलं. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं. आता जंगल दाखवायचं काम आम्ही करणार आहोत. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत", असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.
(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)
"मी पालकमंत्री झालो म्हणून काहीजण गोव्यात जात आहे. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं", असा इशारा नितेश राणेंनी दिला. "उबाठा व महाविकास आघाडीचं गाव टार्गेट करा, गाडीत बसवून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा", अशा सूचना देखील नितेश राणेंना कार्यकर्त्यांना दिल्या