जाहिरात

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर एकही शौचालय दिसले नाही, कोर्टाने MSRTCचा खोटारडेपणा उघड केला

समृद्धी महामार्गवर 120 पोर्टा केबिन म्हणजे तात्पुरते शौचालय बांधल्याच MSRDC म्हंटलं आहे, त्यावर आम्हाला एकही शौचालय दिसले नसल्याचं निरीक्षण नागपूर खडपीठांने नोंदवले.

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर एकही शौचालय दिसले नाही, कोर्टाने MSRTCचा खोटारडेपणा उघड केला

Samruddhi Mahamarg Highway News:  महायुती सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. नागपूर ते मुंबई असा सुरु झालेला हा समृद्धी महामार्ग नको त्या कारणांमुळेच चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर कुठेही शौचालय नसल्याचा आरोप करत अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. यावरुच आता नागपूर खंडपीठानेही MSRDCचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. 

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आम्हाला शौचालय दिसले नाही या स्पष्ट शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा खोटारडेपणा उघड केला आहे. समृद्धी महामार्गवर 120 पोर्टा केबिन म्हणजे तात्पुरते शौचालय बांधल्याच MSRDC म्हंटलं आहे, त्यावर आम्हाला एकही शौचालय दिसले नसल्याचं निरीक्षण नागपूर खडपीठांने नोंदवले.

Palghar News: वाढवण-तवा दीड तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत! महामार्गासाठी NHAI ने निविदा मागवल्या

 समृद्धी महामार्गवर मूलभूत सोयीसुविधा धरून याचिका नागपूर खंडपीठात सुरू आहे.  यात समृद्धी महामार्गवर 30 नागरी सुविधा केंद्र उभारले जात आहे. 22 सुरू झाली असून 8 केंद्राचे काम सुरू असल्याचा दावा MSRDC च्या वतीने करण्यात आला. यावर कोर्टाने शौचालय कुठे आहे, याचीकाकर्त्यांनी फोटो आणि लोकेशनसह अहवाल करून कोर्टाला द्यावा तसेच 12 सप्टेंबरला होणार असल्याचे निर्देश दिले.

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील करुळ घाट दरड कोसळल्याने बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com