जाहिरात

Video:पतीला ट्रेनमध्ये धक्का देत मारहाण केली..मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीनं परप्रांतीय महिलेला धू धू धुतलं!

MNS Leader Vs Non Maharashrian Woman Viral Video : मनसे पदाधिकारी स्वरा काटे यांनी परप्रांतीय महिलेला मनसे स्टाईलने दिला चोप..मनसे कार्यालयातील तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल.

Video:पतीला ट्रेनमध्ये धक्का देत मारहाण केली..मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीनं परप्रांतीय महिलेला धू धू धुतलं!
MNS vs Non Maharashtrian Woman Viral Video
मुंबई:

MNS Leader Vs Non Maharashrian Woman Viral Video : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्ते मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढतात आणि आंदोलनही करतात, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. जे परप्रांतीय लोक मराठी माणसांना विनाकारण त्रास देतात, अशा लोकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. विशेषत: रेल्वे प्रवासात मराठी भाषेवरून वाद करणाऱ्या लोकांना मनसे स्टाईलनं धडा शिकवला जातो. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान नसणाऱ्या लोकांना मनसे कार्यकर्ते धारेवर धरतात आणि त्यांना मराठी भाषा शिकण्याचं आवाहन करतात. अशीच एक घटना कळवा स्टेशन परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. 

कळवा स्टेशन परिसरात नेमकं काय घडलं?

अर्जून काटे नावाच्या मराठी व्यक्तीला एका परप्रांतीय महिलेनं ट्रेनमधून उतरत असताना धक्का दिला. त्यानंतर काटे यांनी महिलेसोबत मराठीत संवाद साधत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेनं अर्जुन काटे यांना शीविगाळ करत मारहाण केली आणि मराठी लोकांबाबत अपशब्दही वापरले. महिलेनं विनाकारण धिंगाणा घातल्यानं काटे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. अर्जून काटे यांच्या पत्नी स्वरा काटे मनसेच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत परप्रांतीय महिलेला मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात नेलं. त्यानंतर काटे यांनी महिलेच्या कानशिलात लगावली आणि तिला माफी मागायला सांगितलं. या घटनेबाबतची माहिती आणि व्हिडीओ मनसे पदाधिकारी विनायक बिटला यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. 

नक्की वाचा >> Pune News: चमडी गल्लीतील स्वप्नीलसह अमित बहादूरकरला उचलले, बंडू आंदेकर गँगला मोठा हादरा!

विनायक बिटला यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, मनसे पदाधिकारी स्वरा काटे यांचे पती अर्जुन काटे हे रेल्वेमधून उतरले. त्यानंतर स्थानिक परिसरात चालत असताना परप्रांतीय महिलेनं त्यांना मागून धक्का दिला आणि त्यांना ढकलले. अर्जुन काटे यांनी महिलेला मराठीत विनंती केली की, मॅडम धक्का मारत जाऊ नका,नीट जा..परंतु, काटे मराठीत बोलल्यानं त्या महिलेनं त्यांना खालच्या स्तरावर शिवीगाळ केली आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरत मारहाण केली. तसच इतर लोकांनाही शिवीगाळ केली.

मनसे स्टाईलने परप्रांतीय महिलेला दिला चोप, इथे पाहा व्हिडीओ

अर्जून यांनी त्या महिलेला उलट उत्तर न देता थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पुढील कारवाई केली. परंतु,या महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना अद्दल घडवणे गरजेचे होते.म्हणूनच मनसे पदाधिकारी स्वरा काटे व त्यांचे पती त्या महिलेला मनसे जनसंपर्क कार्यालय येथे घेऊन आले व त्या महिलेला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची माफी मागायला लावली. ही परप्रांतीय लोक मराठी माणसांना विनाकारण त्रास देत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल समोर येतात. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला डिवचले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामध्ये कोणतीही तडजोड करणार नाही मग ते कोणीही असो,यांचा माज उतरवणार हे नक्की.या निमित्ताने सर्व अमराठी लोकांना ही समज देत आहे की महाराष्ट्रात राहत आहात तर प्रेमाने राहा.मराठी माणसाच्या नादी लागू नका. जय महाराष्ट्र!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com