जाहिरात

Maharashtra Politics: पुन्हा इलेक्शनचा धुरळा! 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Maharashtra Politics Supreme Court: सुप्रीम कोर्टाने हे सर्वात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Politics:  पुन्हा इलेक्शनचा धुरळा! 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे आदेश

रामराजे शिंदे, दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या.. असे सर्वात महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हे सर्वात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी जागा पूर्ववत केल्या आहेत. 2022 ला जे राजकीय आरक्षण होतं. तेच कायम असणार आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. 

त्यानंतर कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत. सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायला सांगितलं आहे. यावेळी सर्व पक्षांना विचारणा केली असता निवडणूक घेण्यास कोणालाही विरोध नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर कोर्टाने 4 आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?

कोर्टाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे:

  •  निवडणुका इतक्या काळ प्रलंबित ठेवण्यामागे कोणताही तर्क आहे का?
  • सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने OBC आरक्षणाचे वाचन JK बांटिया आयोगाच्या 2022 मधील अहवालाच्या आधीच्या कायद्याच्या चौकटीत केले पाहिजे. 
  • OBC आरक्षण हे 2022 पूर्वी अस्तित्वात असलेल्या नियमांवर आधारित असावे.
  • सहा सदस्यीय आयोगाने जुलै 2022 मध्ये आपला अहवाल सादर केला होता.
  •  त्या अहवालाशिवाय, मागासलेपणाच्या स्वरूपासंदर्भात विचार करण्यासाठी आयोगाची स्थापना आणि इतर अनेक मुद्दे सध्या न्यायालयासमोर प्रलंबित आहेत.
  • अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. लोकशाहीच्या घटनात्मक आदेशानुसार, जमिनीच्या पातळीवर वेळोवेळी निवडणुका होणे आवश्यक आहे.
  •  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 2022 पूर्वीची आरक्षण व्यवस्था लागू होणार.
  • JK बांटिया आयोगाच्या आधारे या निवडणुकांमध्ये OBC आरक्षण दिले जाईल