जाहिरात

Kasara Ghat Closed : कसारा घाट किती दिवस बंद राहणार? नाशिकला जाताना पर्यायी मार्ग कोणता असेल?

दुरुस्तीच्या कामासाठी कसारा घाट बंद ठेवण्यात आला असून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Kasara Ghat Closed : कसारा घाट किती दिवस बंद राहणार? नाशिकला जाताना पर्यायी मार्ग कोणता असेल?

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाचं दुरुस्तीच काम आजपासून सुरू झालं आहे. त्यामुळे 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत कसारा घाट (Kasara Ghat) सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरू झालं आहे. त्यामुळे 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत कसारा घाट सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय डागडुजीच्या कामासाठी 3 ते 6 मार्चदरम्यानही चार दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला असल्याने हे चारही दिवस हा घाट बंद असेल. 

Heat Wave : घराबाहेर पडताना काळजी घ्या; राज्यातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

नक्की वाचा - Heat Wave : घराबाहेर पडताना काळजी घ्या; राज्यातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घातली असून काही वाहने कसारा बायपास येथे थांबवून ठेवण्यात आली. या ट्रफिक ब्लॉकमुळे खोडाळा, विहीगाव, जव्हार, मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिरमार्गे नवीन कसारा घाटातून वळवली आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत, महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी छाया कांबळे, राम होडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनची टीमदेखील तैनात आहे.

जुन्या कसारा घाटातील दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहनचालकांना विनाअडथळा प्रवास करता येईल. दरम्यान नाशिककडे नवीन घाटातून जाताना वेगावर नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुरुवारपर्यंत कसारा घाट बंद

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: