हयातीचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू, मिरज तहसील कार्यालयातील हृदयद्रावक घटना

सखुबाई बनसोडे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. सखुबाई या मिरजच्या किल्ला भागात राहत होत्या. सखुबाई बनसोडे या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

सांगलीतील मिरज तहसील कार्यालयात 81 वर्षीय वृद्ध महिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पेन्शनसाठी लागणाऱ्या हयातीचा दाखला घेण्यासाठी ही महिला तहसील कार्यलयात आली होती. मात्र तिथेच महिलेला मृत्यूने गाठलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सखुबाई बनसोडे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. सखुबाई या मिरजच्या किल्ला भागात राहत होत्या. सखुबाई बनसोडे या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजनेचे पेन्शनचे पैसे मिळावे यासाठी त्यांना संबंधित विभागाकडे हयातीच्या दाखल्याचा पुरावा सादर करावा लागणार होता. 

(नक्की वाचा- क्रीडाविश्व हादरलं! ठाण्यात कबड्डी खेळाडू १७ वर्षीय तरुणीची हत्या, प्रशिक्षकाला अटक)

हाच दाखला मिळवण्यासाठी त्या सकाळी मिरजेच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या होत्या. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

(नक्की वाचा - कर्नाटकात गर्भपात, सांगलीत मृत्यू, 'त्या' प्रकरणात कविता सिस्टरमुळे धक्कादायक बाब उघड)

दरम्यान या घटनेनंतर सामाजिक संघटनांकडून  शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे. वृद्ध नागरिकांना दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात असे हेलपाटे माराले लागत असतील, तर ही शरमेची बाब आहे. मीरज येथील संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखला झाला पाहिजे. तसेच शासनाच्या या कारभाराविरोधात आंदोलनचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article