अमोल गावंडे पाटील, बुलडाणा
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरालगत असलेल्या श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील एका 11 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चा होत आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेगाव येथील श्री गजानन महाराज निवासी मतिमंद निवासी विद्यालयात एकूण 100 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेतात. सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होण्यास सुरुवात झाली. यामध्ये प्रायमरीमध्ये शिकणाऱ्या ज्ञानेश आखरे या 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या शौचामधून रक्त जाण्याचा प्रकार उघडकीस आला.
(नक्की वाचा - Tigers Death : दहा दिवसांत पाच वाघांचे मृत्यू तर दोन वाघ बेपत्ता, संशयास्पद मृत्यूमुळे वनविभाग अलर्टवर)
शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याला तातडीने शेगावच्या सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर विद्यार्थ्याला सोडून देण्यात आलं. दरम्यान आज मंगळवारी सकाळी पुन्हा या विद्यार्थ्याला त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा - Kerla Crime: 4 वर्षात 64 जणांकडून अत्याचार, 40 जणांची नावे कळाली; 6 जण अटकेत)
आणखी चार विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. राजदीप रत्नदीप हिवाळे आणि अभिषेक वामन परीहार यांच्यावर शेगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी रुग्णालयाला भेट देऊन याबाबतची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे आणि पोटदुखी व इतर त्रासाबद्दलचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोस्ट मॉर्टमनंतरच विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असं डॉ. रामेश्वर पुरी यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world