Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यातील कुटुंबियांना 50 लाख आणि शासकीय नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: आठ दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिकसहाय्य करण्याची घोषणा केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची महत्त्वाची घोषणा केली.

त्यासोबतच या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यात आपले वडील गमावलेल्या असावरी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी चर्चा झाली होती. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यासोबतच ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल तसेच ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

त्याचबरोबर 'आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासोबत राज्य सरकारने एक नवीन एव्ही पॉलिसी केली आहे. याच्यामध्ये पॅसेंजर ईव्ही आहेत त्याकरिता मोठ्या प्रमाणात सबसीडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट टोलमध्ये सूट देण्याचाही निर्णय घेतला आहे. ईव्ही निर्मिती तसेच चार्जिंग इनस्फ्रास्टर वाढले पाहिजे, यासाठीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे,' अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Advertisement

(नक्की वाचा- Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव)

दरम्यान, या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला ज्यामध्ये  अतुल माने (डोंबिवली), संजय लेले (डोंबिवली), हेमंत जोशी (डोंबिवली) संतोष जगदाळे (पुणे), कौस्तुभ गणबोटे (पुणे) दिलीप देसले (पनवेल) यांचा समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले असून एनआयकडून हल्लेखोरांचा सखोल तपास सुरु आहे.