प्रेयसी-प्रियकराचे कडाक्याचे भांडण, त्याने तिला निर्जनस्थळी नेऊन केले भयंकर कृत्य

Palghar Crime News: प्रेयसी आणि प्रियकरामध्ये कडाक्याचे भांडण झालं आणि त्यानंतर जे काही घडले ते अंगावर काटा आणणारे होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बोईसरजवळील मुरबे गावामध्ये घडली आहे. स्नेहा पुरुषोत्तम चौधरी (वय 19 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तर सुमित तांडेल (वय 21 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघंही मुरबे गावातील रहिवासी आहेत. तसेच दोघेही तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये काम करत होते. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपी सुमितला सातपाटीमधून अटक केली आहे.

(नक्की वाचा: 'गुन्हेगारीचा एक नवा अध्याय सुरू करणार!', 'गब्बर'च्या व्हायरल पत्राने संभाजीनगरमध्ये खळबळ)

नेमके काय घडले?

स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण स्नेहाच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता. सोमवारी (10 जून) सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही बाईकने कामावर जाण्यासाठी निघाले होते. पण कुंभवली गावाजवळ त्यांचे रस्त्यातच कडाक्याचे भांडण सुरू झाले. यादरम्यान रागाच्या भरात सुमितने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. स्थानिकांनी दोघांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. काही त्यांचे फोटो देखील काढले. यावेळेस गोंधळलेल्या सुमितने स्नेहाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, असे सांगून स्नेहाला बाईकवर बसवले आणि एकलारे गावाजवळील परिसरात घेऊन गेला. निर्जनस्थळी नेऊन तिच्या डोक्यात पुन्हा दगड घातला आणि तिचा मृतदेह खाडीतच टाकून तो पसार झाला. सुमितला तेथून एकटेच घाईघाईमध्ये निघाल्याचे पाहून स्थानिकांना संशय आला. 

Advertisement

(नक्की वाचा: Nagpur Hit And Run Case: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले...)

यानंतर लोकांनी या दोघांच्या भांडणाचे फोटो मुरबे आणि एकलारे गावाच्या ग्रुपवर व्हायरल केले. हे फोटो पाहून स्नेहाच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्नेहाचा शोध न लागल्याने अखेर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. खूप शोधाशोध केल्यानंतर स्नेहाचा मृतदेह एकलारे गावाच्या बाजूला असलेल्या खाजणातील पाण्यात आढळला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र भराभर फिरवली आणि सुमितच्या मुसक्या आवळल्या. 

Advertisement

(नक्की वाचा: Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल)

Lok Sabha 2024 Results | लंकेंचे PA निशाण्यावर, लोकसभा निकालानंतर नगरमध्ये मोठा राडा

Topics mentioned in this article