जाहिरात

Palghar News: आंब्याच्या झाडावर आश्रय.. माय-लेकाचा 10 तास मृत्यूशी संघर्ष; पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना!

बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी दीपक पाटील यांच्यासह भूपेश भोईर, सागर पाटील, स्वप्नील पाटील, परेश घाग, धनाजी मुलीक आणि दर्शन पाटील सहभागी झाले होते.

Palghar News: आंब्याच्या झाडावर आश्रय.. माय-लेकाचा 10 तास मृत्यूशी संघर्ष; पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना!

मनोज सातवी, पालघर:

Palghar Rain:  पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पालघर जिल्ह्यातील नागझरी गावात सूर्या नदीच्या भीषण पुरामुळे एका मायलेकावर जीव वाचवण्यासाठी तब्बल दहा तास आंब्याच्या झाडावर आश्रय घेण्याची वेळ आली. सकाळी सुमारे १० वाजल्यापासून दोघेही पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. नदीचे पाणी गावात शिरून गळाभर पातळीपर्यंत वाढल्याने त्यांना खाली उतरणे अशक्य झाले होते.

पावसाचा हाहाकार, माय लेक १० तास आंबाच्या झाडावर बसले

घटनेची माहिती मिळताच पालघर तहसील प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या आचोळे येथील मुख्य अग्निशमन केंद्राच्या जवानांनी रात्रीच्या अंधारात स्पीड बोटीच्या सहाय्याने धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवत मायलेकाची सुखरूप सुटका केली. या बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी दीपक पाटील यांच्यासह भूपेश भोईर, सागर पाटील, स्वप्नील पाटील, परेश घाग, धनाजी मुलीक आणि दर्शन पाटील सहभागी झाले होते.

पालघर जिल्ह्यातील किराट गावाजवळ सूर्या नदीला आलेल्या भीषण पुरामुळे अनेक नागरिक विविध पाड्यांमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी वेगवान प्रवाहाची पर्वा न करता युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

Rain Alert: पुणेकरांनो सावधान! घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा; कुठे- कुठे कोसळणार?

पुराच्या विळख्यातून २७ नागरिकांची सुटका! 

या धाडसी मोहिमेदरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४ लहान मुलांसह ५ महिला, तसेच एकूण २७ नागरिकांना आणि २ श्वानांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. वेगवान पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल हवामान अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही एनडीआरएफच्या जवानांनी सर्वांना सुखरूप सुरक्षितस्थळी पोहोचवले.

या संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व एनडीआरएफचे इन्स्पेक्टर महेंद्र सिंह पूनिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर उपनिरीक्षक नंदकिशोर पावडे, हेड कॉन्स्टेबल सुरेश कदम आणि संपूर्ण एनडीआरएफ पथकाने तत्परता, धाडस आणि समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली.

Palghar School Holiday: पालघरमध्ये मुसळधार पाऊस! या 3 जिल्हांतील शाळा-महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com