Palghar News: महिला दिनीच गर्भवतीचे हाल, शासकीय रुग्णालयात प्रवेश नाकारला; प्रसुतीसाठी रात्रभर धावपळ

डहाणू येथील कॉटेज या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या वेळी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण देत रुग्णालयाने प्रवेश देण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

Palghar News: रविवारी (८,मार्च) राज्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवशी महिलांच्या सन्मानार्थ राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे महिला दिन साजरा होत असतानाच त्याचदिवशी गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी रात्रभर रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागल्याची संतापजनक घटना डहाणूमध्ये घडली आहे. डहाणूच्या शासकीय रुग्णालयाने प्रवेश नाकारल्याचा आरोप या कुटुंबियाने केला आहे. 

प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये धावपळ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डहाणूच्या वडकुन येथील दर्शना माच्छी या भगिणीला रात्रीच्या वेळी प्रसुती वेदना सुरु झाल्या.  प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर  त्यांना तातडीने डहाणू येथील कॉटेज या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या वेळी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण देत रुग्णालयाने प्रवेश देण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

Baramati Morcha: 'कॉलेजला अजित पवारांचे नाव नको..', बारामतीत निघणार निषेध मोर्चा; जीआर रद्द करण्याची मागणी!

त्यानंतर कुटुंबियांनी महिलेला दोन ठिकाणी खासगी रुग्णालयात नेले, मात्र तिथेही डॉक्टर नसल्याचे सांगत उपचारासाठी नकार दिला. शेवटी पहाटे साडे तीनच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले, तिथे त्यांची प्रसुती झाली. डहाणू शासकीय रुग्णालयाने उपचारास नकार दिल्याने रात्रभर या रुग्णाची हेळसांड झाली.

शासकीय रुग्णालयात प्रवेश नाकारला

याबाबत दर्शना माच्छी त्यांनी सांगितले की, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रसुती कळा सुरु झाल्या. त्या पती सासूसह शासकीय रुग्णालयात गेल्या. यावेळी तिथल्या नर्सनेच त्यांची तपासणी केली आणि नंतर डॉक्टर नसल्याचे सांगित दुसऱ्या दवाखान्यात जाण्यास सांगितले. तोपर्यंत १ तास त्यांना तिथेच थांबवून ठेवले. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात गेले तिथेही डॉक्टर नसल्याचे सांगण्यात आले. 

Advertisement

Madha Crime: माढ्यात राडा! लाठ्याकाठ्यांनी हल्ला, डोकी फोडली; भाजप ZP सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा

अखेर श्रद्धा रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. महिलादिनीच अशी हेळसांड झाल्याने दर्शना यांनी संताप व्यक्त केला आहे.  आमच्यासोबत जो प्रकार घडला तो पुन्हा कोणत्याही रुग्णासोबत घडू नये.  प्रत्येक रुग्णालयात इमर्जन्सी डॉक्टर असायलाच हवेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सततच्या वैद्यकीय सेवे अभावी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.