Palghar News: मराठी नाही, हिंदीच बोलणार.. परप्रांतियाचा माज; शिवसैनिकांनी धु धु धुतला!

Marathi Hindi Controversy: काही दिवसांपूर्वीच  विरारमध्ये मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकाने एका दुचाकीस्वाराला मारहाण केली होती. या रिक्षाचालकाला आता शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, 

Palghar Marathi Hindi Controversy:  राज्यात सध्या मराठी-हिंदी वाद सुरु असून मुंबईत परप्रांतियांची मुजोरी पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांना मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकार वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच  विरारमध्ये मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकाने एका दुचाकीस्वाराला मारहाण केली होती. या रिक्षाचालकाला आता शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

Marathi Vs Hindi: "दुबई किंवा सिंगापूरला जा, तिथे भाषा शिकण्याची गरज नाही" केडियानंतर आणखी एक व्यावसायिक बरळला

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  विरार मधील 'त्या' मुजोर परप्रांतीय रिक्षा चालकाला अखेर शिव सैनिकांकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे. राजू पटवा या रिक्षा चालकाला  विरार स्टेशन परिसरात भर रस्त्यात शिवसेना (UBT)गटाच्या कार्यकर्त्यांनी  चोप दिला आहे. शिवाय ज्या भावेश पडोलीया आणि त्याच्या बहिणीला मारहाण  केली होती, त्यांची माफी मागायला लावलं.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्र, मराठी भाषा आणि महापुरुषांची देखील माफी मागायला लावली. या वेळी मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत अपनास्पद बोलल्यास त्याला शिवसेना स्टाईल ने उत्तर देणार असे विरार शहर प्रमुख उदय जाधव यांनी ठणकावलं आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्य ककर्त्यांसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement

Marathi Hindi Row: मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तथाकथित...' 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल

गेल्या आठवड्यात भावेश पडोलीया या दुचाकीस्वार तरुणाने रिक्षा चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याचा जाब मराठीतून विचारल्याने रिक्षाचालकाने त्याला हिंदीमध्ये बोलण्याची केली सक्ती करत त्याला आणि त्याच्या बहिणीला मारहाण देखील केली होती.  मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी भावेश पडोलीया हा मराठीत बोलत असताना मुजोर रिक्षाचालक राजू पटवा याने त्याला आणि त्याच्या बहिणीला, शिवीगाळ करून धक्काबुक्की आणि मारहाण करत हिंदी बोलण्याची सक्ती केली होती.