जाहिरात

Marathi Vs Hindi: "दुबई किंवा सिंगापूरला जा, तिथे भाषा शिकण्याची गरज नाही" केडियानंतर आणखी एक व्यावसायिक बरळला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मुंबईत मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि एका व्यावसायिकाने राज ठाकरे यांच्यावर टीका करून मराठी शिकण्यास नकार दिल्यानंतर कार्यालय तोडफोड केल्याच्या घटनांनंतर हा वाद अधिकच वाढला आहे.

Marathi Vs Hindi: "दुबई किंवा सिंगापूरला जा, तिथे भाषा शिकण्याची गरज नाही" केडियानंतर आणखी एक व्यावसायिक बरळला

Hindi Lagnuage Controversy Row: मुंबईत सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला आहे. मीरा रोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांना मराठीच्या मुद्द्यावरून परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर वादंग उठलं आहे. गुंतवणूकदार सुशील केडिया यांच्यानंतर आणखी एक व्यावसायिक या प्रकरणी चर्चेत आला आहे. मुंबईत मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे एका स्टार्टअप संस्थापकाने अक्षय श्रीवास्तव यांनी लोकांना दुबई किंवा सिंगापूरला जाण्याचा सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मुंबईत मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि एका व्यावसायिकाने राज ठाकरे यांच्यावर टीका करून मराठी शिकण्यास नकार दिल्यानंतर कार्यालय तोडफोड केल्याच्या घटनांनंतर हा वाद अधिकच वाढला आहे.

(नक्की वाचा-  Shinde Sena MLA Violence : आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरुन संजय गायकवाडांचा राडा; कँटिन चालकाला बेदम मारहाण)

अक्षय श्रीवास्तव यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये लोकांना दुबई किंवा सिंगापूरला जाण्याचे आवाहन केले आहे. श्रीवास्तव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,  "तेथे स्थानिक भाषा शिकण्याची कोणी अपेक्षा करत नाही. तुम्हाला ती भाषा येत असेल तर तो एक बोनस आहे, परंतु ती येत नसेल तर तुम्हाला गुंड मारहाण करणार नाहीत. फक्त कायद्याचे पालन करा. चांगले रहिवासी बना. त्यांच्या अर्थव्यवस्थेत योगदान द्या. आणि, त्या बदल्यात चांगल्या सुविधा मिळवा. तुमच्या मुलांसाठी चांगले भविष्य मिळेल. तसेच, करिअरच्या चांगल्या संधीही मिळतील. जगा आणि जगू द्या."

(नक्की वाचा - Maharashtra Assembly Session: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना डिवचलं, पाहा सर्व VIDEO)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यातील आपल्या भाषणात, महाराष्ट्रात नोकरी धंद्यासाठी येणाऱ्या लोकांना मराठी भाषा आलीच पाहिजे. पण त्यासाठी त्यांना मारण्याची गरज नाही. मात्र जर कुणी अति करत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या कृतीचे समर्थन करत म्हटले की, जर आम्हाला न्यायासाठी गुंडगिरी करावी लागली तर आम्ही गुंडच आहोत. मनसे मुंबईचे प्रमुख संदीप देशपांडे यांनी थापड मारण्याच्या घटनेचे समर्थन करत म्हटले की, मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हे घडले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com