Ashadhi Wari 2025 : कोरोनाग्रस्तांना अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही, गांभीर्याने घेऊ नका!

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 629 कोरोनाग्रस्त असून काल 14 रुग्णांची भर पडली होती. 1 जानेवारी 2025 पासूनची आकडेवारी पाहिल्यास कोरोनाची लागण झालेले आणि त्यातून बरे झालेले/ रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले  एकूण 1162 रुग्ण होते

जाहिरात
Read Time: 3 mins
Prakash Abitkar Pandharpur Visit : आरोग्यमंत्री आबिटकर हे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर होते
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत असून यामध्ये गेल्या काही दिवसांत काहीशी वाढ झाल्याचेही दिसते आहे. आषाढी वारी तोंडावर आली असून या पार्श्वभूमीवर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.  आरोग्यमंत्री आबिटकर हे शुक्रवारी (13 ptv 2025) पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबद्दल विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्याला कोरोनाचे सध्या नक्की किती रुग्ण आहेत याची माहिती नसल्याचे सांगितले.  

आषाढी पालखी सोहळ्याला सुरूवात होण्यापूर्वी अकलूज आणि माळीनगर इथे चार संशयित कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढलेली असताना आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत केलेल्या विधानांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, कोरोना आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. सध्याच्या कोरोनाची लक्षणे सौम्य प्रकारची आहेत. त्यामुळे कोरोनाला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही आणि कोरोना झाला तरी कुठे ही रुग्णालयात जाण्याची गरज नाही. 

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 629 कोरोनाग्रस्त असून काल 14 रुग्णांची भर पडली होती. 1 जानेवारी 2025 पासूनची आकडेवारी पाहिल्यास कोरोनाची लागण झालेले आणि त्यातून बरे झालेले/ रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले  एकूण 1162 रुग्ण होते.  कालच्या तुलनेत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 98 ने वाढली आहे. भारतातील कोरोनाच्या रुग्णांबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 7131 इतकी असून 10976 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे किंवा ते बरे झाले आहेत. 

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025

  1. 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
  2. 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी 
  3. 21/06/2025 पुणे मुक्काम 
  4. 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
  5. 23/06/2025 सासवड मुक्काम 
  6. 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
  7. 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
  8. 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी 
  9. माऊलींना निरास्मान 
  10. 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी 
  11. 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी 
  12. 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी 
  13. 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी 
  14. बरड येथे गोल रिंगण
  15. 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी 
  16. सदाशिवनगर येथे गोल रिंगण
  17. 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी 
  18. खुडूस येथे गोळ रिंगण
  19. 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी 
  20. ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
  21. 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
  22. बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 
  23. 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
  24. वाखरी येथे गोल रिंगण 
  25. 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
  26. 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025 

  1. 18 जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम 
  2. 19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम 
  3. 20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम 
  4. 21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम 
  5. 22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम 
  6. 23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम 
  7. 24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम 
  8. 25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम 
  9. 26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम 
  10. 27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
  11. 28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम 
  12. बेलवडी येथे पहिले गोल रिंगण 
  13. 29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम 
  14. इंदापूर येथे गोल रिंगण 
  15. 30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम 
  16. 1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम 
  17. निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण 
  18. 2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम 
  19. माळीनगर येथे उभे रिंगण 
  20. 3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम 
  21. 4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम 
  22. बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 
  23. 5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम 
  24. वाखरी येथे उभे रिंगण 
  25. 6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान 
  26. 10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात