टँकरने पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली, मात्र वादळाने झोपवली; शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

दुष्काळामुळे पाण्याची कमतरता असल्यान मुकुंद पवार या शेतकऱ्याने टँकर पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली. मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या डाळिंब बागेचे वादळात पूर्ण नुकसान झाले.

Advertisement
Read Time: 1 min

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

आधीच दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीने आणखी अडचणीत आणलं आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान आहे. दुष्काळात कसंबसं जगवलेल्या डाळिंबातून आता कुठे उत्पन्न सुरु होणार होतं. मात्र फळे विकण्याआधीच वादळी वाऱ्यामुळे बाग भूईसपाट झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुष्काळामुळे पाण्याची कमतरता असल्यान मुकुंद पवार या शेतकऱ्याने टँकर पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली. मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या डाळिंब बागेचे वादळात पूर्ण नुकसान झाले. शेतकऱ्याच्या हाताशी आलेल्या फळपिकाला आता कवडीमोल भावाने विकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी मुकुंद पवार चिंतेत आहेत. 

(नक्की वाचा- जळगावात वादळीवाऱ्यामुळे कोसळले घर, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू)

Electricity Tower

(नक्की वाचा: आग, धूर आणि किंकाळ्या! 32 जणांचा मृत्यू, मृतांची ओळख पटवण्यासाठी करणार DNA टेस्ट)

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पंढरपूर तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये डाळिंब केळी, आंबा अशा बागांमधील फळे उन्मळून पडली. त्यामुळे निर्यातक्षम गुणवत्तेचे 150 रुपये दराने  विकले जाणारे डाळिंब आता निम्म्याहून कमी किमतीत विकले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. डाळिंब पिकांसह पंढरपूर तालुक्यात वीज वितरण करणारे टॉवरही वाकले गेले. यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला.

Topics mentioned in this article