Pandharpur News: नवे वर्ष विठ्ठलाच्या सानिध्यात घालवण्यासाठी भक्तांना संधी! फक्त 'हे' एक काम करावे लागणार

नव्या वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावी. अशा भक्तांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी 

नवी वर्षाची सुरूवात अनेक जण आपापल्या पद्धतीने करता. कोणी बाहेरच्या ठिकाणी फिरायला जातं. तर कुणी निवांत राहाणं पसंत करतं. पण अनेक जण मंदिरात जावू देवाचे दर्शन घेवून नव्या वर्षाची सुरूवात करतात. असं करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देवावर श्रद्धा असते. या श्रद्धे पोटी भक्त देवाच्या चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लीन होतात. त्यात आता पांडूरंगाच्या भक्तांसाठी एक मोठी संधी मंदीर समितीने उपलब्ध करून दिली आहे. या नुसार भक्तांना आता थेट पांडूरंगाची पुजा करता येणार आहे.   

नव्या वर्षात विठ्ठलाच्या सर्व पूजा करण्याची नामी संधी आता उपलब्ध झाली आहे. भाविकांसाठी ही मोठी खूश खबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने दिली आहे. 1 जानेवारी 2026 पासून विठ्ठलाची नित्य महापूजा, पाद्यपूजा , महानैवेद्य सेवा आणि तुळशी अर्चना पूजा आशापूजांसाठीचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.  26 डिसेंबर पासून याचे बुकींग करण्यास सुरूवात होईल. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावी. अशा भक्तांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Raj Thackeray: पत्रकार परिषद ठाकरे बंधूंची, पण चर्चा मात्र राज ठाकरेंची, 5 भन्नाट उत्तरांने विरोधकांना धडकी

अशा भक्तांच्या अपेक्षेला आता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पूजा बुकिंगच्या माध्यमातून वाट करून दिली आहे. विठ्ठलाची पहाटेची नित्य पूजा 25 हजार रुपये देणगी शुल्क घेऊन केली जाते. तर पाद्यपूजेसाठी 5000 , तुळशी पूजासाठी 2100 तर महानैवेद्य सेवेसाठी 7000 रुपये देणगी शुल्क आकारले जाते. या सर्व 1 जानेवारीपासून च्या पूजा आहेत. त्याची ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे.  

नक्की वाचा - Raj-Uddhav Thackeray: "मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच असेल!", राज ठाकरेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

24 डिसेंबर पासून पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहेत.अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भक्तांना विठ्ठलाची पूजा करायची आहे त्यांनी या संकेत स्थळावर जावून बुकींग करावे. पांडूरंगाचे भक्त जगभर पसरले आहेत. त्यामुळे ही सेवेची संधी ते नक्कीच सोडणार नाहीत. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world