जाहिरात

Raj Thackeray: पत्रकार परिषद ठाकरे बंधूंची, पण चर्चा मात्र राज ठाकरेंची, 5 भन्नाट उत्तरांने विरोधकांना धडकी

त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी या पत्रकार परिषदेत बाजी मारली. त्यामुळेच त्यांची चर्चा होत आहे.

Raj Thackeray: पत्रकार परिषद ठाकरे बंधूंची, पण चर्चा मात्र राज ठाकरेंची, 5 भन्नाट उत्तरांने विरोधकांना धडकी
  • राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असणार आहे
  • राज ठाकरे यांनी जागा वाटपाच्या आकड्यांबाबत थेट उत्तर देण्याऐवजी सस्पेन्स वाढवला
  • राज्यातील मुलं चोरणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर आरोप केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सभा असो की पत्रकार परिषद नेहमीच आपली छाप सोडून जातात. त्यांच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तूळात होते. त्यांच्या बोलण्याचा अर्थ ही लावला जातो. आज  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेतली. यात ही चर्चा मात्र राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत दिलेल्या उत्तरांचीच जास्त होती. यात कुठे तरी उद्धव ठाकरे झाकोळले गेले. काही उत्तरां वेळी तर राज यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून बॅटींग करताना विरोधकांवर निशाणा साधला. अशाच पाच भन्नाट उत्तरांचा आढावा आपण घेणार आहोत. 

नक्की वाचा - Raj-Uddhav Thackeray: "मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच असेल!", राज ठाकरेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

1) मुंबईचा महापौर 
राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मुंबईचा महापौर कोण होणार हे स्पष्ट केले. त्यांनी ठासून सांगितले की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो ही आमचाच होणार असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना आणि मनसेची युती कधी होणार याची प्रतिक्षा होता. या युतीची घोषणा आज आम्ही करत आहोत असं ही त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांबरोबरच मनसैनिकांनी ही जल्लोष केला. 

2) जागा वाटपाबाबत थेट वक्तव्य 
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती तर झाली. पण प्रत्येकाला उत्सुकता होती ती जागा वाटपाची. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न होता. पत्रकारांनही त्याचेच उत्तर हवे होते. मात्र राज यांनी याबाबत प्रश्न विचारण्याच्या आतच त्याचे उत्तर देवून टाकले. त्यांनी स्पष्ट केले की, कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हा आकडा  नाही सांगणार तुम्हाला असं सांगत त्यांनी जागा वाटपाचा सस्पेन्स वाढवा. मात्र ज्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे त्यांना आम्ही कधी फॉर्म भरायचा आहे हे सांगणार आहोत. त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल असं ही त्यांनी सांगितलं.  

3) मुलं चोरणारी टोळी 
राज ठाकरे हे आपल्या हजरजबाबी पणासाठी ओळखले जातात. त्याचा प्रत्येय ही पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदे निमित्ताने आला. सध्या राज्यात मुलं चोरणारी टोळी सक्रीय आहे. त्यात आणखी दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षातील मुलं चोरतात असा टोला त्यांनी यावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला लगावला. त्यामुळे जे लढवणारे आमचे उमेदवार आहेत त्यांनी आम्ही वेळ आल्यावर उमेदवारी जाहीर करू. शिवाय त्यांनी अर्ज ही देवू. त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं.      

4) माझ्याकडे बरेच व्हिडीओ 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही यावेळी राज ठाकरे यांनी टोला लगावला. सध्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते अल्ला आफीस बोलताना दिसत आहेत. असे अनेक व्हिडीओ माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगू नये. वेळ येईल तसे हे व्हिडीओ एक एक बाहेर काढेन. शिवाय ते काय बोलतात त्यावर माझ्याकडे व्हिडीओ तयार आहेत असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. शिवाय जे पक्ष सोडून गेलेले आहेत त्यावर ही त्यांनी भाष्य केलं. त्यांना परत घ्यायचं की नाही ते त्या त्या वेळेला घेवू असं ही त्यांनी सांगितलं.  

5) उद्धव यांच्या मदतीला धावले 
महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपेल असं वक्तव्य भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रतिक्रीया देण्याच्या पातळीचे राहीले आहेत का ते. त्यांच्या पक्षात त्यांना ही कोणी विचारत नाही असं उत्तर उद्धव यांनी दिलं. पण त्याच वेळी राज यांना सावरलं. त्यांनी उद्धव यांच्या हातातून माईक घेतला. ते म्हणाले उत्तर 'दानवां'ना नाही तर देवांना दिले जाते. असं सांगत त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारली. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी या पत्रकार परिषदेत बाजी मारली. त्यामुळेच त्यांची चर्चा होत आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com