- नववर्षाच्या पहिल्या दिवशी भक्त विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन पूजा करतात
- १ जानेवारी २०२६ पासून विठ्ठलाची नित्य महापूजा, पाद्यपूजा, आणि महानैवेद्य सेवा ऑनलाईन बुकिंगद्वारे करता येणार
- पूजा बुकिंगची सुरुवात २६ डिसेंबरपासून www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर होईल
संकेत कुलकर्णी
नवी वर्षाची सुरूवात अनेक जण आपापल्या पद्धतीने करता. कोणी बाहेरच्या ठिकाणी फिरायला जातं. तर कुणी निवांत राहाणं पसंत करतं. पण अनेक जण मंदिरात जावू देवाचे दर्शन घेवून नव्या वर्षाची सुरूवात करतात. असं करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देवावर श्रद्धा असते. या श्रद्धे पोटी भक्त देवाच्या चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लीन होतात. त्यात आता पांडूरंगाच्या भक्तांसाठी एक मोठी संधी मंदीर समितीने उपलब्ध करून दिली आहे. या नुसार भक्तांना आता थेट पांडूरंगाची पुजा करता येणार आहे.
नव्या वर्षात विठ्ठलाच्या सर्व पूजा करण्याची नामी संधी आता उपलब्ध झाली आहे. भाविकांसाठी ही मोठी खूश खबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने दिली आहे. 1 जानेवारी 2026 पासून विठ्ठलाची नित्य महापूजा, पाद्यपूजा , महानैवेद्य सेवा आणि तुळशी अर्चना पूजा आशापूजांसाठीचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. 26 डिसेंबर पासून याचे बुकींग करण्यास सुरूवात होईल. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावी. अशा भक्तांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे.
अशा भक्तांच्या अपेक्षेला आता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पूजा बुकिंगच्या माध्यमातून वाट करून दिली आहे. विठ्ठलाची पहाटेची नित्य पूजा 25 हजार रुपये देणगी शुल्क घेऊन केली जाते. तर पाद्यपूजेसाठी 5000 , तुळशी पूजासाठी 2100 तर महानैवेद्य सेवेसाठी 7000 रुपये देणगी शुल्क आकारले जाते. या सर्व 1 जानेवारीपासून च्या पूजा आहेत. त्याची ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे.
24 डिसेंबर पासून पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहेत.अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भक्तांना विठ्ठलाची पूजा करायची आहे त्यांनी या संकेत स्थळावर जावून बुकींग करावे. पांडूरंगाचे भक्त जगभर पसरले आहेत. त्यामुळे ही सेवेची संधी ते नक्कीच सोडणार नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world