जाहिरात

Pankaja Munde : 'धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता'; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

Pankaja Munde on Santosh Deshmukh murder case : हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा होता, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

Pankaja Munde : 'धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता'; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

Pankaja Munde on Dhananjay Munde's resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड मानली जात आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत यापूर्वी बोलणं टाळत होत्या. मात्र आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंकजा मुंडे यावेळी म्हणाले, संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र ते फोटो पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही. देशमुखांवर अत्याचार करणाऱ्या तरुणांनी त्यांचे व्हिडिओ काढले. त्यांनी दाखवलेली निर्मनुष्यता संताप वाढवणारी आहे. ज्या समाजातील तरुणांनी ही हत्या केली त्यांच्यामुळे राज्यातील तो समाज मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे. तर ज्या समाजातील व्यक्तीसोबत हे घडलं त्यांच्यामध्ये आक्रोश आहे. शेवटी प्रत्येक गोष्ट जातीवर जाते. मात्र आरोपीला कोणतीही जात नसते. त्यावर निर्णय घेणाऱ्यालाही जात असता कामा नये. सत्ताधाऱ्याच्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येकाने कोणाबद्दलही आकस न बाळगता काम करायला हवं. 

Santosh Deshmukh Murder :'धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा!' दमानिया, धसांनी सांगितलेलं 'सातपुडा' कनेक्शन काय?

नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder :'धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा!' दमानिया, धसांनी सांगितलेलं 'सातपुडा' कनेक्शन काय?

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, देशमुखांच्या हत्येवर निषेध व्यक्त करताना त्यांच्या आईची मी मनापासून क्षमा मागते. संतोष देशमुखांची इतक्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे की, जर ते आरोपी माझ्या पोटचे असते तरीही त्यांनाही कडक शासन करा हीच मागणी केली असती. 

देर आये दुरुस्त आये...
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा होता. मला तर वाटतं मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती, तर कदाचित या पुढच्या घटनांना सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनीही आधीच हा राजीनामा घ्यायला हवा होता. धनंजयने आधीच राजीनामा द्यायला हवा होता. यासर्व वेदनांपासून गरिमामय मार्ग मिळाला असता. कोणत्याही बहिणीला आपल्या कुटुंबातील व्यक्तीला अशा दु:खाला जावं लागेल. मात्र जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करतो तेव्हा राज्याच्या प्रत्येक व्यक्तीचा सारखाच विचार करायला हवा. संतोष देशमुखाच्या कुटुंबाचा वेदनांपुढे हा निर्णय अजिबातच मोठा नाही. धनंजयने घेतलेला निर्णय योग्यचं. देर आये दुरुस्त आये.