जाहिरात
3 hours ago

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे याना रम्मी खेळणं अखेर भोवलं आहे. त्यांना मंत्रिपदावरून जरी हटवण्यात आलं नसल तरी त्यांचे खाते बदलण्यात आलं आहे. त्यांच्या कडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. 

माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते अखेर दत्ता भरणे यांच्याकडे

माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते अखेर दत्ता भरणे याकडे दिले. 

अधिकृत प्रशासकीय आदेश काढले 

अखेर कोकाटे यावर खाते बदलण्याची कारवाई

माणिकराव कोकाटे यांचे खाते अखेर बदलले, आता क्रीडा खात्याची जबाबदारी

माणिकराव कोकाटे यांचे खाते अखेर बदलले आहे. त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे   आता क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. रम्मी खेळल्यामुळे कोकाटे यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती. शिवाय राज्यभर त्यांच्या विरोधात निदर्शनेही झाली होती. अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे.  

Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको वर शरद पवार गटाचा मोर्चा

नवी मुंबई शहरातील गरजेपोटी घरांचा प्रश्न निर्माण झालाय प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सरकारकडून केली जात आहे तसेच सिडकोणी 26हजार घरांची लॉटरी काढली मात्र त्या घरांचे किंमत भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे शक्य नाहीये याच मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याचं काम शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोवर मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आहे

Live Update: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक

बैठकीसाठी पोहोचलेले खासदार

श्रीकांत शिंदे

नरेश म्हस्के

संदीपान भूमरे

रवींद्र वायकर

Malegaon Blast Update: हिंदुत्ववादी संघटना फटाके फोडण्यास मज्जाव, पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

मालेगावमध्ये पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटना फटाके फोडण्यास. पोलिसांनी केला मज्जाव.....

पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची ...

काही तणावाचे वातावरण...

मात्र दुसरीकडे कार्यकर्त्यांनी ढोल तश्यांच्या  गजरात केला आनंदोत्सव....

साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रतिमा घेत केला जल्लोष...

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण...

Live Update: मालेगावातील सेंसिटिव्ह परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

- मालेगाव बॉम्बस्फोट  खटल्याचा आज निकाल निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर 

- नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष खबरदारी 

- मालेगावातील सेंसिटिव्ह परिसरात पोलिसांचा असणार बंदोबस्त 

- अतिरिक्त पोलीस बंदोबस्तसह बाहेरील पोलिसांचा देखील  बंदोबस्त तैनात 

-  आरसीपी एस आर पी क्यू आर टी च्या कंपन्या देखील असणार तैनात

Live Update: पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता: सुधीर मुनगंटीवार

 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष जाहीर केल्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या घटनेवर अनेकांनी आक्षेप घेतले होते. शंका उपस्थित केली होती. कोणताही संबंध नसताना काही लोकांना यात गोवण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगळता इतर सर्व संघटनांनी यावर शंका उपस्थित केली होती. शेवटी कोणताही पुरावा नसल्याने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असावी, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

Malegaon Bomb blast:मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात दाखल, कोणत्याही क्षणी निकाल येणार

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात दाखल, कोणत्याही क्षणी निकाल येणार

Live Updates: काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशासाठी जालन्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत.. कैलास गोरंट्याल आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.. दुपारी 3 वाजता मुंबई येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी जालन्यातील गोरंट्याल यांचे शेकडो समर्थक मुंबईकडे रवाना झाले असून आजी माजी नगरसेवकांसह गोरंट्याल भाजप पक्षात प्रवेशकरत आहेत.. दरम्यान जय श्री रामच्या घोषणा देत कार्यकर्तांनी शहरातून रॅली काढली.

Live Updates: पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: प्रांजल खेवलकर यांची पोलिस कोठडी आज संपणार

पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरण

प्रांजल खेवलकर यांची पोलिस कोठडी आज संपणार

दुपारी ३ नंतर खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

खेवलकर यांना आज न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता

खेवलकर यांच्यासह इतर ५ आरोपींना सुद्धा आज न्यायालयात हजर केलं जाणार

खेवलकर यांच्यासह निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे आणि श्रीपाद यादव यांना ३१ तारखेपर्यंत सुनावली होती न्यायालयाने पोलिस कोठडी

Live Update: रत्नागिर प्राथमिक शाळांतील २० हुशार विद्यार्थ्यांची USA - NASA Study Tour 2025 साठी निवड

रत्नागिरी जिल्हा परिषद व रत्नागिरी नगर परिषद यांच्या प्राथमिक शाळांतील २० हुशार विद्यार्थ्यांची निवड USA - NASA Study Tour 2025 साठी झाली असून, या सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांची भेट घेतली.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून इतक्या विद्यार्थ्यांना नासाच्या अभ्यासदौर्‍यासाठी पाठवलं जात आहे. दरम्यान हे रत्नागिरीसाठी गौरवाचे आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणेचे क्षण आहेत.

Latur News: लातूर जिल्ह्यात पोष्टाची 51 हजार खाती निष्क्रीय

लातूर जिल्ह्यात डाक विभागात विविध प्रकारच्या 51 हजार खात्यांवर व्यवहारच झाले नसल्याने खाते  निष्क्रीय झाले आहेत. दरम्यान फक्त केवायसी करून खाते पुन्हा सुरू करता येणार असल्याचे डाक विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर केवायसी न केल्यास 51 हजार खाते गोठवणार असल्याचा इशारा डाक विभागाकडून देण्यात आलाय. आधारकार्ड पॅणकार्ड  तसेच मोबाईल क्रमांकासह अर्ज भरून दिल्यास केवायसी पूर्ण होणार असल्याची माहिती डाकविभागाकडून देण्यात येत आहे.

Live Updates: धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात आढळली अळी

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ 

शाळेच्या पोषण आहारात आढळले बुरशी कीड लागलेले दुर्गंधीयुक्त साहित्य

लोहारा तालुक्यातील नागराळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार

सोयाबीन वडीला आला भूरा, तर किडलेल्या डाळी आणि एक्सपायरी डेट संपलेले पॅकेट मधील साहित्य

संत पालकांनी लोहारा येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनासमोर फेकले साहित्य

संबंधित पुरवठादारावर कठोर कारवाई करण्याची पालकांची मागणी

Live updates: मालेगाव बॉमस्फोट खटल्याचा आज निकाल, 17 वर्षानंतर दोषींना शिक्षा होणार?

मालेगाव बॉमस्फोट खटल्याचा आज निकाल ...

17 वर्षानंतर दोषींना शिक्षा होणार ?  ....

2008 साली भिक्कू चौकात झाला होता बॉम्बस्फोट...    

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सात हिंदुत्ववादी नेत्यांवर आरोप...

मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात लागणार निकाल...

बॉम्बस्फोटात 6 नागरिक झाले होते ठार .100 पेक्षा अधिक जखमी...

बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने प्रथमच हिंदुत्ववादी दहशतवाद आला होता समोर...

मृत व पिडीतांच्या कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा...

संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष...

Live Updates: पावसाने मनमाडमधील कॉलनी रस्ते चिखलमय, नागरिकांना चिखलातून काढावी लागतेय वाट

काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने नाशिकच्या मनमाड शहरातील नववासाहती व  कॉलनी भागातील रस्ते चिखलमय झाले.जलवाहिनी  व नवीन नळ कनेक्शन देण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची मातीमुळे रस्त्यांवर चिखलमय झाल्याने नागरिकांना त्यात वाट काढणे अवघड होऊन बसले आहे.तर चिखलात चालतांना पाय घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहे तर दुचाकीस्वार व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना  करावा लागत आहे.

Live Updates: राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे... 

Live Updates: टोमॅटोची आवक घटल्याने भाव आठवड्याभरातच दुप्पट

 नंदुरबार बाजार समितीत सद्यस्थितीत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून आठवड्या भरापूर्वी ४० रुपये किलो प्रमाणे मिळणारा टोमॅटोचे भाव दुप्पट झाले असून टोमॅटो आता ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्याभरात होत असलेल्या पावसामुळे आवक कमीच राहणार असल्याने येणाऱ्या दिवसात आणखीन भाव वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. टोमॅटोचे भाव वाढीमुळे सध्या गृहिणी टोमॅटो खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Live Updates: शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात शिंदेंची शिवसेनेची संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के वाटा शिवसेनेच्या असावा यासाठी मार्गदर्शक करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले.

Live Update: ठाण्यात शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना वाद पेटला..

- ठाण्यात शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना वाद पेटला..

- ⁠शिवसेनेने लावलेले बॅनर उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले..

- ⁠माजी खासदार राजन विचारे यांच्या निषेधाचे लावले होते बॅनर...

- ⁠राजन विचारे यांच्या चेह-यावर फुली मारल्याचे चित्र लावले होते बॅनरवर...

- ⁠यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण तापलं...

- ⁠माजी खासदार विचारे यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेने केला होता निषेध... 

- ⁠”ॲापरेशन महादेव अंतर्गत अतिरेक्यांना मारले म्हणजे काय मेहरबानी केली नाही “...

- ⁠असे वक्तव्य केले होते माजी खासदार राजन विचारे यांनी...

- मेंटल हॉस्पिटल बाहेर केले होते शिवसेनेने आंदोलन...

- ⁠आता उबाठा शिवसेने बॅनर फाडल्याने... शिवसेना कार्यकर्ते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...

Listen to the latest songs, only on JioSaavn.com