जाहिरात

ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाकरे गटातून बाहेर पडताच या अधिकाऱ्याच्या बदलीची केली मागणी

Omraje Nimbalkar: सत्तेत आल्यानंतर आपल्या मतदारसंघातील पहिलेच काम असल्याचे सांगत ओमराजे यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि एका महत्त्वाच्या बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.

ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाकरे गटातून बाहेर पडताच या अधिकाऱ्याच्या बदलीची केली मागणी

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

Dharashiv News: महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींनंतर सत्तेत प्रवेश करताच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोणतीही विश्रांती न घेता थेट जनसेवेच्या कामांना सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यानंतर आपल्या मतदारसंघातील पहिलेच काम असल्याचे सांगत ओमराजे यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि एका महत्त्वाच्या बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अणदूर येथील डॉक्टरच्या बदलीसाठी थेट मंत्र्यांशी संवाद

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथील रहिवासी असलेले आणि सध्या धाराशिव जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरची निलंगा येथे बदली व्हावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. ही मागणी घेऊन काही नागरिक आणि संबंधित व्यक्ती खासदारांकडे गेले होते.

(नक्की वाचा-  Nashik MLC Election: नाशकात सर्वात मोठा उलटफेर! गोकुळ गितेंचा 'गनिमी कावा'; नरेंद्र दराडेंचा पराभव करत विजयी)

नागरिकांची अडचण समजून घेताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी क्षणाचाही वयोगट न लावता थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावला. "मंत्री महोदय, सत्तेत आल्यानंतर माझ्या मतदारसंघातील हे पहिलेच काम आहे," असे सांगत त्यांनी या बदलीची विनंती थेट मंत्र्यांकडे लावून धरली.

आरोग्यमंत्री आबिटकर यांचे सकारात्मक आश्वासन

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या थेट फोननंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. "तुम्ही या संदर्भातील अधिकृत विनंती पत्र पाठवा, मी हे काम करतो", असे स्पष्ट आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी ओमराजे यांना दिले. मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे संबंधित डॉक्टरच्या बदलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

(नक्की वाचा-  JD Vance यांच्या भारत-पाकिस्तानातील 2 आवडत्या व्यक्ती; एक आसिम मुनीर, तर भारतीय व्यक्तीचं नाव चकीत करणारं)

नागरिकांकडून ओमराजेंचे आभार

पक्षप्रवेशानंतर आणि सत्तेत सामील झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ओमराजे निंबाळकर यांनी शासकीय पातळीवरील प्रलंबित कामांचा श्रीगणेशा केला आहे. कोणत्याही प्रोटोकॉलच्या जंजाळात न पडता थेट मंत्र्यांशी संपर्क साधून काम करून घेण्याच्या त्यांच्या या 'हाय-स्पीड' कार्यपद्धतीची झलक धाराशिवकरांना पाहायला मिळाली आहे. काम तात्काळ मार्गी लागल्याचे दिसताच अणदूर येथील संबंधित नागरिकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com