जाहिरात

Dharashiv News: ओमराजे निंबाळकरांची खासदारकी धोक्यात? मल्हार पाटलांच्या राजकीय चाल चर्चेत

Dharashiv Politics: भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आणि भाजप युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात 'भावी खासदार' आणि 'MP2029' असे बॅनर्स झळकले आहेत.

Dharashiv News: ओमराजे निंबाळकरांची खासदारकी धोक्यात? मल्हार पाटलांच्या राजकीय चाल चर्चेत

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

धाराशिवच्या राजकारणातील पारंपरिक राजकीय संघर्ष आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महायुतीत प्रवेश केलेले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत आगामी काळात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आणि भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सनी संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. या बॅनर्सवर मल्हार पाटील यांचा उल्लेख थेट "भावी खासदार" असा करण्यात आला असून, त्यावर "MP2029" असे ठळकपणे लिहिण्यात आले आहे. या थेट आव्हानामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांची खासदारकी 2029 च्या आगामी निवडणुकीत धोक्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा-  MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?)

महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन काम करतील अशी अपेक्षा असताना, भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी थेट लोकसभेच्या जागेवरच दावा ठोकल्याने महायुतीमधील अंतर्गत विसंवाद समोर आला आहे.

थेट खासदारकीला आव्हान 

धाराशिव शहरात मुख्य चौकाचौकांमध्ये झळकलेले हे बॅनर्स पाहून सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय विश्लेषकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की, मल्हार पाटील हे आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी आतापासूनच सज्ज झाले आहेत. 

(नक्की वाचा-  Accident Time: सावधान! रात्रीचा 'हा' एक तास प्रवासासाठी सर्वात धोकादायक; रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर)

पाटील विरुद्ध निंबाळकर

धाराशिव जिल्ह्याला पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्या काळापासून चालत आलेल्या राजकीय वैराचा मोठा इतिहास आहे. आता हीच राजकीय लढाई पुढच्या पिढीत म्हणजेच मल्हार पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी रंगणार असल्याचे संकेत या बॅनरबाजीतून मिळाले आहेत.

खासदार ओमराजे यांनी महायुतीत प्रवेश करून स्वतःची जागा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असला, तरी जिल्ह्यातील भाजप युवा नेतृत्व त्यांना सहजासहजी ही जागा सोडण्यास तयार नाही, हेच यावरून स्पष्ट होते. आता या आव्हानाला खासदार ओमराजे कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com