सुजित आंबेकर, सातारा
साताऱ्यातील नागरिकांना सध्या आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोन्सची धास्ती घेतली आहे. साताऱ्यातील फलटण, माण या ठिकाणी रात्रंदिवस ड्रोन कॅमेरे उडताना दिसत आहेत. मात्र या डोन्सची भानगड काय आहे, यातून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकी करून चोरटे चोऱ्या करणार नाही ना?, असा संभ्रम नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
(नक्की वाचा - VIDEO : रीलच्या नादात कार दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू)
नागरिकांच्या मनातील भीती ओळखून पोलीस देखील सतर्क झाले आहेत. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी म्हटलं की, अशा प्रकारचा ड्रोन उडवताना कुणी आढळल्यास तात्काळ पोलिसांना फोन करून याबाबत माहिती द्यावी. यावर पोलीस योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील.
परंतु असं करताना कुणी आढळल्यासा कायदा हातात घेऊ नका. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या. नागरिकांनी त्यांना मारहाण वगैरे करू नये, असं आवाहन देखील पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलं आहे.
(नक्की वाचा- दारुडे वडील, आईने घर सोडलं; 3 अल्पवयीन बहिणींसोबत भयंकर घडलं)
सातारा जिल्ह्यातील फलटण, माण तालुक्यात रात्रंदिवस आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन नेमके कुणाचे आहेत? ड्रोन उडवण्याचं कारण काय? यासारखी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांना देखील याबाबत ठोस माहिती मिळाली नाही. पोलीस याचा तपास करत आहेत.