Akola News : आईचा प्रियकर रात्री दार उघडायचा आणि...; 8 वर्षांच्या चिमुरडीने बाबांना सांगितला घडलेला प्रकार

अकोला शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Akola News : अकोला शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीवर आईच्या ओळखीतील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. पीडित मुलीचे वडील मजुरीचे काम करतात. कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी मागील वर्षापासून वेगळे राहत असून तीनही मुली आईसोबत नायगाव परिसरात वास्तव्यास आहेत. आईचे आरोपी सोहेल खान याच्यासोबत संबंध असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार शहराला हादरवून सोडणारा ठरला आहे.

मुलीचा धक्कादायक खुलासा

यादरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी फिर्यादी वडिलांना त्यांच्या दुसऱ्या मुलीकडून फोन आला. आरोपीने मारहाण केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर वडील तातडीने मुलींकडे पोहोचले. मोठ्या मुलीने त्यांच्यासमोर गंभीर आरोप करत सांगितले की, आई घरी नसताना आरोपी रात्री घरी येत असे आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत असे. विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचेही मुलीने सांगितले. तिने ही बाब यापूर्वी आईलाही सांगितल्याचा उल्लेख केला आहे. मुलीच्या या जबाबानंतर वडिलांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

नक्की वाचा - Crime News: 'हनी ट्र्रॅप' स्टाईल टोळीमुळे नवी मुंबईकर चिंतेत! भीक मागून नागरिकांना बनवतात कंगाल

पोलिसांची तत्काळ कारवाई; आरोपी अटकेत

घटनेची गंभीर दखल घेत अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सोहेल खान याला तातडीने अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अकोला शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Topics mentioned in this article