Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; चंद्रपुरातील खळबळजनक घटना

Chandrapur Crime News : चिमूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

Chandrapur Crime News : चंद्रपूर एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून शेतात नेऊन सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ही घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन पैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एकजण फरार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या आजीच्या घरी चालत जात असताना युवतीसोबत ओळख असलेला प्रतीक साटोने याने तिला दुचाकीवर सोडण्याचं सांगून तिला शेतात घेऊन गेला आणि लैंगिक अत्याचार केला. 

नक्की वाचा - Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू

त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना विकी साटोने आणि अंकित काकडे यांना बोलावून तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. घटना एप्रिल महिन्यात घडली असून बदनामीच्या भीतीने पीडितेने आतापर्यंत कोणालाही काही सांगितलं नव्हतं. अखेर महिनाभरानंतर धाडस करून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

(नक्की वाचा-  Ambarnath News : पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अल्पवयीन मुलाचा मृत्यू)

चिमूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात संबंधित आरोपींवर लैंगिक अत्याचार आणि धमकीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article