जाहिरात

Crime News: घरी चेन्नईला जातोय असं सांगितलं, पण पुण्यात आढळला मृतदेह; त्या 24 व्या मजल्यावर नेमकं काय घडलं?

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Crime News: घरी चेन्नईला जातोय असं सांगितलं, पण पुण्यात आढळला मृतदेह; त्या 24 व्या मजल्यावर नेमकं काय घडलं?

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pimpri Chinchwad Crime:  पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 24 व्या मजल्यावरून उडी घेत 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वैभव सुतार असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

 पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची आत्महत्या

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेटकर सियोना सोसायटीमध्ये 25 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव वैभव सुतार असे आहे. वैभव सुतार हा आपल्या मित्र सौरभ तापकीर याच्या घरी गेला होता. त्याठिकाणी सौरभ तापकीर आणि हर्षवर्धन चिंचकर दोघे उपस्थित होते. इमारतीच्या २४ व्या मजल्यावर सौरभचा फ्लॅट होता, तिथे जेवण करण्याचा तिघांचा बेत होता. 

Maharashtra Politics: राज्यसभेसाठी ठाकरे गटात रस्सीखेच! 'या' इच्छुकांची फिल्डिंग; शरद पवारांचं काय ठरलं?

रात्री जेवण केल्यानंतर वैभव फ्लॅटच्या बाहेर आला आणि मोकळ्या पॅसेजच्या उंच भिंतीवरून उडी घेत त्याने टोकाचं पाऊल उचलले.  ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. घटनेनंतर दोन्ही मित्रांनी वैभवला तात्काळ पवना रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैभव हा उच्चशिक्षित असून त्याने बीबीएचे शिक्षण घेतले होते. तो सौरभच्या व्यवसायात हातभार लावत होता.

नोकरीबाबत खोटं सांगितलं

धक्कादायक बाब म्हणजे, वैभव सौरभ तापकीर याच्याकडे कामाला होता, तो मित्राच्या व्यवसायात मदत करत होता, मात्र आपल्या आई-वडिलांना तो हैद्राबाद तसेच चेन्नई येथे आयटी क्षेत्रात काम करत असल्याचे सांगत होता. याठिकाणीच कामासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होते.  त्यामुळे तो नेमक्या कोणत्या तणावात होता ? आणि त्याने आपल्या कुटुंबीयांना खोटी माहिती का दिली ? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Pune News: पुण्यात पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी! 'RDX' वापरण्याचा ईमेलमध्ये उल्लेख

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com