पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात बुधवारी रात्री गोळीबाराचे थरारनाट्य पाहायला मिळाले. सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी (29 मे 2024) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दीपक कदम (वय 30 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सांगवी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माहेश्वरी चौकातील मुख्य रस्त्यावर तोंडावर कापड गुंडाळून बाईकवरून आलेल्या दोन जणांनी सराईत गुन्हेगार दीपक कदमच्या छातीवर आणि मानेच्या बाजूला दोन गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दीपक कदमला उपचारांसाठी औंध जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सांगवी पोलिसांनी फरार आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे काम हाती घेतले आणि एका संशयिताला ताब्यातही घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत.
(नक्की वाचा: गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या)
दरम्यान पूर्व वैमनस्यातून दीपक कदमची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज सांगवी पोलिसांनी वर्तवला आहे.
नक्की वाचा : अदलाबदल भोवली, पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर मोठी कारवाई)
(नक्की वाचा : गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांची धाड; 3 कोटींचा मुद्देमाल जप्त)
Pune drunk and drive case | पुणे अपघात प्रकरणी सर्वात मोठी बातमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world