PCMC News: सावधान! 'कडक फुलचंद' खाताय? तुम्हीही व्हाल शिकार; पान खाताच गुंगी, पुण्यात धक्कादायक प्रकार

पोलिसांनी पोर्टेबल ड्रग्ज टेस्टींग किटचा वापर करून हे बिंग फोडले. या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा अधिक तपास अमली पदार्थ विरोधी पथक आणि पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pimpri Chinchwad News:  पान खाल्ल्यानंतर किक बसावी यासाठी त्यात घातक अंमली पदार्थांचे मिश्रण करून विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कडक फुलचंद या पानाच्या नावाखाली तरुणांना नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या या टोळीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया करत मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोर येथील मैफिल पान हाऊसवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला असता, तिथे मिळणाऱ्या पांढऱ्या पावडरमध्ये अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथॅम्फेटामाइन यांसारखी घातक अंमली द्रव्ये आढळली. याप्रकरणी आकुर्डी येथील कैलास मांढरे आणि अनुराधा मांढरे या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

Maharashtra Politics: मुंबईत मोठी घडामोड! ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंविरोधात नाराजी, सर्व खासदार मातोश्रीवर

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हिंजवडी जवळील जांबेगाव येथील चैतन्य फूड गोडाऊनवर धाड टाकली. या कारखान्यात नशिल्या भुकटीचे उत्पादन केले जात असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी सुमारे ६.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल, काळे द्रावण आणि एक कार जप्त केली आहे. अशीच दुसरी कारवाई चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे करण्यात आली.

येथील मंगलमूर्ती पान स्टॉलवर छापा टाकून पोलिसांनी ज्ञानेश्वर नामदेव वानखेडे याला अटक केली. त्याच्याकडून ७१० ग्रॅम वजनाची अंमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त करण्यात आली आहे. या पावडरची बाजारपेठेतील किंमत सुमारे ८० हजार रुपये प्रति किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पान खाल्ल्यावर गुंगी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी पोर्टेबल ड्रग्ज टेस्टींग किटचा वापर करून हे बिंग फोडले. या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा अधिक तपास अमली पदार्थ विरोधी पथक आणि पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

MBBS Graduate Dies : आवडीने मांजर घरात आणली, MBBS तरुणीने गमावला जीव; आईला मोठा धक्का... नेमकं काय घडलं?