जाहिरात

Gaja Marne: गुंड गजा मारणे पत्नीच्या प्रचाराला येणार! हायकोर्टाचा मोठा निर्णय; पुणे पोलीस अलर्ट मोडवर

कोणतीही सार्वजनिक सभा, समर्थकांशी संपर्क किंवा शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे त्याला बंधनकारक असणार आहे.

Gaja Marne: गुंड गजा मारणे पत्नीच्या प्रचाराला येणार! हायकोर्टाचा मोठा निर्णय; पुणे पोलीस अलर्ट मोडवर

अविनाश पवार, पुणे:

Pune Municipal Corporation Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पुण्यामध्ये अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिल्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. उमेदवारी मिळाल्यामुळे पुण्यामध्ये अनेक गुंडांच्या टोळ्या आपल्या कुटुंबियांना निवडून आणण्यासाठी प्रचारात सक्रीय झाल्याची चर्चा होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी असलेला गजा मारणेही पत्नीच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये येणार आहे. 

गजा मारणेला पुण्यात प्रवेश..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गजा मारणेला पुणे जिल्ह्यामध्ये बंदी असल्यामुळे त्याला प्रचारात येता येत नव्हते. आता  गुंड गजानन मारणेला 15 आणि 16 तारखेला पुण्यात प्रवेश करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी असतानाही, न्यायालयाने काही अटींवर ही तात्पुरती सूट मंजूर केली.

Ladki Bahin Yojana Fact Check: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला 3000 रुपये मिळणार? जाणून घ्या सत्य

गजानन मारणे याने पुण्यातील काही वैयक्तिक आणि कायदेशीर कारणांसाठी शहरात येण्याची परवानगी मागितली होती. त्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या देखरेखीखाली आणि कायदा-सुव्यवस्थेला धक्का न लागेल अशा अटींवर त्यांना पुण्यात येण्यास हिरवा कंदील दिला आहे.
या कालावधीत मारणे याला कोणतीही सार्वजनिक सभा, समर्थकांशी संपर्क किंवा शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे त्याला बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरसह, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला तिकीट देण्यात आले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून गुंड शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com